5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिर्डीमध्ये मुलाकडून बापाचा खून! या घटनेमुळे शिर्डीत खळबळ

शिर्डी ( जनता आवाज वृत्तसेवा):- गेल्या काही महिन्यापूर्वी शिर्डी साई संस्थानचे कर्मचाऱ्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच  आज श्रीसाईबाबांचे शिर्डीतील प्रतिष्ठीत  व्यावसायिक दत्तात्रय शंकरराव गोंदकर,वय ५४) यांचा मृत्यु झाला असून या प्रकरणी शिर्डी पोलीसात उपनिरिक्षक निवांत जगजितसिंग जाधव ( नेमणूक शिर्डी पोलीस स्टेशन ) यांनी काल फिर्याद दिल्यावरून आरोपी शुभम दत्तात्रय गोंदकर,वय २९ रा . शुभम निवास,हॉटेल साई शुभम मागे, शिवाजी नगर,शिर्डी याच्या विरुद्ध भारतिय न्याय सहिंता कलम १०३ (१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की,दत्तात्रय शंकरराव गोंदकर हे त्यांच्याच घरी त्यांची पत्नी संजीवनी गोंदकर हिचे बरोबर काहीतरी कारणाने झटापट करत असतांना मुलगा शुभम गोंदकर याने वडील दत्तात्रय गोंदकर यांना पाईपने मारहाण करत भिंतीवर ढकलुन दिले. त्यात ते गंभीर जखमी झाले.त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.मात्र तेथे दत्तात्रय गोंदकर यांचा मृत्यु झाला . सधन व प्रतिष्ठीत कुटुंबात बापाचा खून मुलाने केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे .

पोलीस निरिक्षक गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि कायंदे हे पुढील तपास करीत आहेत .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!