शेवगाव — ( जयप्रकाश बागडे ) _विद्यार्थी शालेय जीवनात शिक्षणाचे धडे गिरवतात ,त्याचबरोबर त्यांच्यातील असणारे सुप्त कलागुण हे फक्त स्नेहसंमेलनातूनच बाहेर येतात आणि जेव्हा ते रंगमंचावरील रंगी बेरंगी प्रकाश झोतात सादरीकरण करतात तेव्हाच आपल्याला विद्यार्थ्यांमधील दडलेले सुप्त कलागुण पाहायला मिळते आणि मगच होतो टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा भडीमार होऊन प्रेक्षक व पालक वर्ग प्रतिसाद देत असल्याचे गौरवोद्गार शिक्षण विस्तार अधिकारी शंकर गाडेकर सर यांनी काढले.
शेवगांव तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व विद्येची देवता सरस्वती व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ,कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शिक्षण विस्तार अधिकारी शंकर गाडेकर होते .
जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपोआपले विविध गुणदर्शन सादर करताना रेकॉर्ड गीतावर मनमोहक सादर केल्याने प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, स्नेहसंमेलनातून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंम्मेलने हे उत्तम व्यासपिठ असल्याने कलागुणांच्या सादरीकरणातुन विद्यार्थी भविष्यातील सुजान नागरिक घडत असल्याने स्नेहसंमेलन घेणे महत्त्वाचे असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी शंकर गाडेकर सर यांनी म्हटले .
मुख्यध्यापक संतोष पवार यांनी सहकार्यांना घडवण्याचे उत्तम कार्य केले असल्याने गाडेकर सर यांनी त्यांचा सत्कार केला .
पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज भैया घुले पाटील यांनी लहान मुलांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी शाळेत भेट म्हणून फिल्टर दिले आहे .
यावेळी पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकारी शंकर गाडेकर सर, मुख्याध्यापक संतोष पवार , सचिन शिसोदिया सर , कुशाबा पलाटे सर , सामाजिक कार्यकर्ते लहुराव भवर , शालेय व्यवस्थापन समितीचे सचिन गरड, माजी सरपंच प्रल्हाद देशमुख , फापाळ सर, गवळी सर , शेख सर, क्षितिज भैया घुले पाटील युवा मंचचे सचिन घोरतळे सर , पोटभरेसर ,पत्रकार जयप्रकाश बागडे, पत्रकार पांडुरंग निंबाळकर ,पत्रकार सुखदेव गायकवाड आदी उपस्थित होते .