6.1 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

पुरुषांनो, तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम आहात का…?

महिला दिनानिमित्त सुंदर असा लेख

पुरुष स्वतः कसे का वागेना पण स्त्रियांनी मात्र बंधनातच राहिलं पाहिजे…अशी वैचारिकता आजच्या काही पुरुषांची झालेली आहे…! आजचे पुरुष मित्र परिवारासोबत बाहेर बिनधास्त फिरतात, सहली व ट्रेकिंगच्या नावाखाली भलतीच धमाल करतात, रंगीत-संगीत पार्टी पण करतात… गेट-टुगेदरच्या गोंडस नावाखाली नको त्या गोष्टी राजरोसपणे करतात…! आणि तेच पुरुष महिलांचा विषय निघाला की भलते संवेदनशील होतात… जसे काय बाहेर फिरण्याचे व सर्व गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने फक्त त्यांनाच दिलेले आहे…!

ते जसे वागतात त्याच्या प्रमाणात 50% जरी घरातील महिला वागली की, लगेच संशयाचं भूत त्यांच्या डोक्यात घुसतं आणि मग नको त्या गोष्टींची, नको त्यावेळी, नको त्या वयात झाडाझडती सुरू होते…

15 ते 20 वर्षांतील मुला-मुलींकडे लक्ष देण्याची खरोखर गरज असते… पण हे पुरुष पार चाळीशीतील महिलांकडे सुद्धा वक्रदृष्टीने व संशयाच्या नजरेने पाहायला सुरुवात करतात, आणि येथेच गणित बिघडते…!

पंधरा-वीस वर्ष अतिशय सुखात चाललेला त्यांचा संसार एका शुल्लक कारणाने डळमळीत होतो.

आम्ही पुरुष आहोत आम्ही केलेले सगळे चालते… पण आम्ही स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ शकत नाही… ती जर बाहेर पडली, स्वतःला व्यवस्थित सिद्ध केलं तर ती आम्हाला काहीच विचारणार नाही… आमची किंमत कमी होईल…?

अशा विचित्र मानसिकतेच्या मित्रांचा एक मोठा ग्रुप तयार होतो… त्यांनी केलेले सगळे चालते पण बायकांनी मात्र घराचा उंबरा ओलांडायला नको, बायकोने बंधनात राहायला पाहिजे… तिने शिस्तीच पालन केलं पाहिजे… तिने आपल्या कुळाची पावित्र्यता राखली पाहिजे…

तुम्ही जर तिच्याकडून माता सीतेची प्रतिमा अपेक्षित ठेवत असाल तर… तुम्हाला पण प्रभु श्रीराम बनण्याची गरज आहे ना…!

तुम्ही हे सगळं कसे काय सोयीस्करपणे विसरू शकता… स्त्री आणि पुरुष हे संसाराच्या रथाची दोन चाके आहेत, त्यामुळे दोघांनी एकमेकांना विश्वासात घेऊन संसाराची वेल फुलवली पाहिजे… आपल्याला जसं स्वातंत्र्य प्रिय वाटतं, तसं आपल्या पत्नीला पण स्वातंत्र्य दिलं पाहिजे… ती आपलं माहेर सोडून तुमच्याकडे राहायला आली म्हटल्यानंतर तिची काळजी घेणं, तिला आनंदी ठेवणं, तिला योग्य ते शिक्षण देणं, तिच्या आवडीनिवडी जपणं, तिला करिअरच्या सर्व संधी उपलब्ध करून देणे, तिच्या मनाचा सर्वांगाने विचार करणं… हे आपली कर्तव्य व नैतिक जबाबदारी नव्हे का…?

ती आपल्या बाळाला नऊ महिने आपल्या उदरात ठेवून त्याचं पालन पोषण करते व आपल्या कुळाचा उद्धार करते…आपला वंश वाढवते, आपल्याला समाजात नवी ओळख निर्माण करून देते, आणि त्या स्त्रीकडे आपण कोणत्या नजरेने बघतो…? याचे आत्मपरीक्षण करण्याची खरोखर गरज आहे…!

पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली स्त्री जातीची व तिच्यातील स्त्री तत्वांची कुचंबाना होऊ नये, एवढीच मापक अपेक्षा आहे…!

पुरुषांनो, स्वतःला शिवभक्त समजत असाल तर* , अजूनही वेळ गेलेली नाही. स्त्री चा सन्मान करायला शिका…

स्त्रीनं ठरवलं तर ती तुम्हाला आबाद करू शकते, नाहीतर……!

समस्त स्त्री वर्गास समर्पित

लेखक -श्री. अंत्रे मधुकर,एम.ए,बी.एड,

सहशिक्षक पी पी एस

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!