श्रीरामपूर(जनताआवाज वृत्तसेवा):- तालुक्यातील अशोकनगर फाटा ते अशोकनगर हा रस्ता गेली 30 वर्षापासून दुरुस्त होत नसल्याने अशोकनगर रस्ता संघर्ष समितीच्या वतीने या अन्याया विरोधात अशोकनगर, निपाणी वडगाव, मातापुर ग्रामस्थांनी “सामुहिक मुंडण” आंदोलनासाठी अशोकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कै. भास्करराव गलांडे पा. यांच्या स्मारकास क्रांतिकारी अभिवादन करून सार्वजनिक बांधकाम विभागावर “सामुहिक मुंडण” आंदोलन व विधीवत पूजन करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
अशोकनगर फाटा ते अशोकनगर रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्रीरामपूर येथील कार्यालयासमोर निपाणी वडगाव, अशोकनगर व मातापूर येथील ग्रामस्थ सामुहिक मुंडण आंदोलनासाठी अशोकनगर रस्ता संघर्ष कृती समितीच्या बॅनर खाली स्वयफुर्तीने मोठ्या संख्येने एकत्र आले होते. अशोकनगरहून मोर्चा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर आल्यावर या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी ग्रामस्थांनी तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अशोकनगर रस्ता संघर्ष समितीचे कार्यकर्ते यांनी सामुहिक मुंडण आंदोलनाच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारात पंचक्रोशीतील ज्येष्ठ गुरु यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन केले. यावेळी तालुक्यातील राजकीय ज्येष्ठ, श्रेष्ठ कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन स्थगित करण्यासाठी विनंती केली. परंतु अशोकनगर रस्ता संघर्ष समितीचे कार्यकर्ते फक्त प्रस्ताव पाठवलेला आहे.
परंतु गेल्या 30 वर्षात सदर प्रस्तावास मंजुरी मिळाली नाही आता कशी मिळणार..? यामुळे कोणीही मुंडण आंदोलनापासून प्रवृत्त होत नव्हते. यासंदर्भात कोणतीही तडजोड होत नसल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांनी थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना फोन लावला. त्यानंतर मा. खा. सुजय विखे पाटील यांनी सर्व ग्रामस्थांसमोर फोनवर संभाषण साधून सदर रस्त्याच्या प्रस्तावास मंजुरी येईपर्यंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून दोन टप्प्यात एक कोटी रूपये देण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. तसेच येत्या आठ दिवसात या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाला मी स्वतः येणार असल्याचे मोबाईलवरून जाहीर करून मुंडण आंदोलन स्थगीत करण्याची करण्यात आली यानंतर अशोकनगर रस्ता संघर्ष समितीचे बैठक झाली. व त्यानंतर मा. खा. सुजय विखे पाटील व भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून तसेच उप अभियंता बापूसाहेब वराळे यांच्या विनंतीनुसार सामूहिक मुंडण आंदोलन स्थगित करण्यात आले.
अशोकनगर फाटा ते अशोकनगर हा रस्ता गेल्या ३० वर्षांपासून दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहे. यासंदर्भात बांधकामचे उपविभागीय अभियंता बापूसाहेब वराळे यांना १५ दिवसांपूर्वीच निवेदन देत निपाणी वडगाव, अशोकनगर व मातापूर येथील ग्रामस्थांनी होळीच्या दिवशी सामूहिक मुंडण आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार मोठ्या संख्येने रस्ता संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अशोकनगर येथून ग्रामस्थांनी जोरदार मोर्चा काढून बांधकाम विभागाच्या कार्य़ालयासमोर तिरंगा ध्वज घेऊन दाखल झाले. यावेळी द्वेषाचे राजकरण बंद करा, अशोकनगरचा रस्ता मंजूर करा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सचिन गुजर, कॉ. बाळासाहेब सुरूडे, कॉ.मदीना शेख, डॉ.सुनिता गायकवाड, मा. सरपंच वनिता राऊत, बाळासाहेब उंडे, प्रवीण लोळगे, प्रवीणराजे शिंदे, मिराताई पारधे, दीपाली चित्ते, विष्णुपंत राऊत, अशोकराव बोरुडे, बी.जी. गायधने, शरद दोंड, अनिल गायके, गणेश गायधने, अजिंक्य उंडे, मुरलीधर राऊत, भाऊसाहेब सोनवणे, सदा कराड, योगेश जाधव, जगन्नाथ खाडे, शिवाजी गोरे, प्रवीणराजे शिंदे, सर्जेराव देवकर, बाळासाहेब ढोरमारे, बाळासाहेब मेटे, नाना मांजरे, अक्षय राऊत, दत्तात्रय जाधव, बाळासाहेब पवार, विलास जाधव, लक्ष्मण लोखंडे, विजय तिवारी, बाबासाहेब साळवे, आनंदा क्षीरसागर, चंद्रकांत काळे, टोनी सेठी, किशोर घोरपडे, अनिल उंडे, संपत राऊत, दत्ता डोंगरे, रावसाहेब उंडे, अजय कदम, भाऊसाहेब सावंत,शिवाजी दोंड, सुधीर गडाख, अकील पठाण, दीपक लोखंडे, जालिंदर उंडे, ओंकार जगताप, साजिद पठाण, बाळासाहेब पिंपळे, ताराचंद नवगिरे, बंडू वाघमारे, शाम आकसाळ, रवींद्र बडाख, वसंतराव उंडे, राजेंद्र देवकर, रोहन शेळके, देविदास साळवे, सागर आगे आदींसह अशोकनगर रस्ता संघर्ष समितीचे प्रमुख सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. मुंडण आंदोलनाला सुरूवात करण्या अगोदर अशोकनगरच्या गुरूंच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. आमदार हेमंत ओगले यांनी अशोकनगर रस्त्याला प्राधान्य दिले आहे. जिल्हा नियोजनातही हा रस्ता सुचविल्याचे ससाणे व गुजर यांनी सांगितले. आपण पंचायत समिती सभापती असतानाच्या २०२१-२२ साली हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकामकडे वर्ग केला. त्यामुळे हा रस्ता करण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे दिपक पटारे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पटारे यांनी वराळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले,केंद्रीय मार्ग निधीकडे (सीआरएफ) या रस्त्यासाठी ५ कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितले. असे प्रस्ताव दरवर्षी जात असल्याने यावर अशोकनगर रस्ता संघर्ष समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे समाधान न झाल्याने पटारे यांनी पालकमंत्री विखे व नंतर डॉ.सुजय विखे यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी आंदोलनकर्त्यांसी संवाद साधत मार्च अखेरपर्यंत ५० लाख व नंतर ५० लाख असा एक कोटीचा निधी दिला जाईल. तसेच पुढील आठवड्यात उद्घाटनाला येण्याचे आश्वासन दिले आहे. अखेर सामूहिक मुंडण आंदोलन स्थगित करण्यासाठी खा. सुजय विखे व दीपक पटारे यांची शिष्टाई महत्त्वाची ठरली. यावेळी ग्रामस्थांनी अशोकनगर रस्ता संघर्ष समिती जिंदाबाद च्या घोषणा देऊन निवेदन देण्यात आले.