श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- खोटा ईतिहास पसरवणाऱ्या टोळ्या हिंदूविरोधी राजकीय पक्षांच्या पाठबळावर सत्तर वर्षात खूप वाढल्याने महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे होते म्हणणारे गल्लीगल्लीत पैदा झाले होते.परंतु छावासारख्या चित्रपटांमुळे खरा ईतिहास लोकांसमोर येत असल्याने जागृत झालेले हिंदू भविष्यात अशा त्या इतिहासकारांना ठेचल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट आणि परखड मत राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी व्यक्त केले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील प्रत्येक गावात,गावातील वाड्या वस्त्यांवर राष्ट्रीय श्रीराम संघाच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा ईतिहास जनतेसमोर यावा या उद्दत्त हिंदुत्ववादी विचाराने छावा चित्रपट मोफत दाखवण्याची मोहीम अध्यक्ष सागर बेग यांच्या दूरदृष्टी प्रेरणेने सुरू करण्यात आली आहे.तालुक्यातील शिरसगाव आणि माळवडगाव या दोन गावात शेकडो ग्रामस्थांना छावा चित्रपट दाखवण्यात आला त्याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने झालेल्या सत्कार सभारंभात सागर बेग हे बोलत होते.
श्रीरामपूर शहरातील महिला व पुरुषांना छावा चित्रपटांचे मोफत शो दाखवल्यानंतर ग्रामीण भागातील महिला व पुरुषांना शहरात येऊन हा धार्मिक व आपल्या धर्मवीर संभाजी महाराजांचा खरा ईतिहास बघणे शक्य होत नसल्याने गावोगावी जाऊनच हा चित्रपट दाखवण्याची मोहीम राष्ट्रीय श्रीराम संघाने सुरू केली असून त्यास ग्रामस्थांचाही उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी सागर बेग यांनी म्हंटले आहे.बेग पुढे म्हणाले की,धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलीदान दिले ती लढाई अजून संपलेली नाही
लवजिहाद,लँडजिहाद,हिंदू लोकांना मित्र बनवून त्यांच्यात राहून शांत डोक्याने चालू असलेला अलतकीया जिहाद सारखे असंख्य जिहाद आज आपला हिंदू धर्म संपवण्यासाठी चालू आहेत.आणि त्याकाळच्या गणोजी,कान्होजीच्या औलादी आज महाराजांचा खोटा ईतिहास परवण्याचे पाप करत जिहादी प्रवृत्तींना एकप्रकारे साथच देत आहेत.विधर्मी लोकांचे असे चालू असलेले कट कारस्थाने हिंदूंनी जागृत होऊन उलथवले पाहिजे त्यासाठी छावा सारखे चित्रपट प्रत्येक जागृत हिंदूंनी बघितलाच पाहिजे आणि बघण्यासाठी प्रवृत्त देखील केले पाहिजे असे कळकळीचे आवाहनही यावेळी सागर बेग यांनी केले.
शिरसगाव याठिकाणी दाखवण्यात येणाऱ्या छावा चित्रपटाला गावातीलच काही जिहादी प्रेमी,हिंदुद्वेषी लोकांनी विरोध केल्याचा निषेध शिरसगाव मधील अनेक हिंदुत्ववादी युवकांनी व महिलांनी केला आहे.शिरसगाव मधील राष्ट्रीय श्रीराम संघाचे रोहित यादव,स्वप्नील शेळके,बाबू कदम तर माळवडगाव येथे पत्रकार रवी आसने,मयूर फिंपळे,संदीप आसने यांच्यासह असंख्य युवक ग्रामस्थ यांनी छावा चित्रपट दाखवण्यासाठी पुढाकार घेतला.