अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर येथे डॉ. विखे पाटील फाउंडेशन विळदघाट येथील जनसेवा कार्यालय येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते.
अहिल्यानगर येथे जनसेवा कार्यालयात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबार संपन्न झाला असून या दरम्यान जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून आपले प्रश्न मांडले. विविध सामाजिक, शासकीय आणि वैयक्तिक समस्यांसंदर्भात नागरिकांनी डॉ. विखे पाटील यांच्याशी थेट संवाद साधला.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक समस्येची गंभीर दखल घेत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जनतेच्या अडचणींवर त्वरित तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. विशेष म्हणजे तब्बल चार ते पाच तास जनता दरबार सुरू होता. या दरम्यान प्रत्येकाला आपले प्रश्न मांडण्याची संधी देण्यात आली व त्यावर चर्चा करून योग्य त्या उपाययोजना करणे संबंधित कारवाई करण्यात येईल असे आश्वस्त करण्यात आले.
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की, जनता दरबार जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अतिशय प्रभावी माध्यम आहे. यामुळे एकाच व्यासपीठावर सर्वांचे प्रश्न मांडले जातात व त्यांचे निरसन करण्याच्या अनुषंगाने देखील तात्काळ सूचना दिल्या जातात. त्यामुळे नक्कीच या जनता दरबाराच्या माध्यमातून साऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील भूमिका घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली.