5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

नेत्याचा पराभव घडवून आणणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नयेत! पद्मश्री विखे पाटील, भास्करराव दुर्वे,बी.जे.खताळांचे फोटो कारखान्यात लावयला सांगा!

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-केवळ ठेकेदारीसाठी नेतृत्वाचा वापर करने हे आमच्या संस्कृतीत नाही. तुमच्या सारख्या माफीयांनीच माजी आ.  थोरातांना खेळणे बनवून त्यांचा पराभव घडवून आणलेल्या सोमेश्वर दिवटेनी आम्हाला निष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत आशी परखड टिका शिवसेनेचे शहर अध्यक्ष दिनेश फटांगरे यांनी केली आहे.

सोमेश्वर दिवटे यांनी आ.अमोल खताळ यांच्यावर केलेल्या टिकेला उतर देताना शिवसेनेचे प्रमुख दिनेश फटांगरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हणले आहे की चाळीस वर्षे तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी कोणती संस्कृती आणि परंपरा जोपासली हे तालुक्याने पाहीले आहे.चाळीस वर्षे निधी आणला

असा दावा करता मग प्रश्न प्रलंबित का राहीले याचे जनतेला कधीतरी उतर द्या असे आवाहन करून सोडवू शकला नाहीत म्हणूनच जनतेन तुमच्या नेत्याला घरी बसविण्याचा सर्वानुमते निर्णय केला असल्याचे म्हणले आहे.

संस्कृती परंपरेचे वारसा जोपासल्याचे सांगता मग कारखाना उभारणीत योगदान देणारे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील स्व.भास्कराव दुर्वे बी.जे खताळ पाटील यांचा नामोल्लेख सुध्दा कुठे ठेवला नाही याची आठवण एकदा आपल्या नेतृत्वाला करून द्या असा सल्ला दिनेश फटांगरे यांनी दिवटे यांना दिला आहे.

संपूर्ण आयुष्य तांबे-थोरातांची लाचारी करणारा एक हतबल काँग्रेसचा कार्यकर्ता आज संगमनेरच्या नवनिर्वाचित आमदारांना गुलामी न करण्याचा सल्ला देतोय, ह्यांना हार एवढी जिव्हारी लागली आहे की ह्यांनी संगमनेरची हस्यजत्रा नावाचा कार्यक्रम चालू केला आहे !

जो स्वतः दशकानुदशके एका घराण्याच्या ताब्यात लाचार होता, त्याने इतरांना स्वाभिमान शिकवण्याचा प्रयत्न करावा, यासारखी ढोंगबाजी दुसरी नाही. सत्ता बदलली, पण काहींची मानसिक गुलामगिरी संपायचं नाव घेत नाही. संगमनेरच्या जनतेने परिवर्तन घडवून आणलंय, आता नवे आमदार स्वबळावर कोणाच्याही दडपशाहीला बळी न पडता, फक्त जनतेच्या भल्यासाठी काम करत आहे.

तालुक्यात परीवर्तन झाल्याने फक्त आपल्यासारखे ठेकेदार आणि खोटे निष्ठावान उघडे पडले आहेत. कोणतेही काम तुम्हाला राहीलेले नाही. त्यामुळेच तुमचाही उपयोग माजी आमदार पाच वर्ष आता खेळण्या सारखा करून घेणार आहेत.थोडा स्वाभीमान असेल तर माजी आमदाराच्या हातातले खेळणे होण्यापेक्षा घरी शांत बसा असेही पत्रकात शेवटी म्हणले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!