श्रीरामपूर (प्रतिनिधी): एका नराधम वृद्धाने दोन वर्षे वयाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याने श्रीरामपूर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने नराधम आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता बुधवार (ता.२२) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नराधम वृद्धाने २ वर्षे वयाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत बलिकेच्या नातेवाईकांकडून शहर पोलिसात फिर्याद देण्यात आली. सदर गुन्हा हा अत्यंत संवेदनशील व गंभीर स्वरुपाचा स्त्री अत्याचार असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्ह्यांतील आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी अंमलदार व गुन्हे शोध पथकाला आदेश दिले. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली.