24 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

ऐनतपूरच्या १२६ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे कामास प्रारंभ

बेलापूर ( प्रतिनिधी): 
येथील जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर असलेल्या सुमारे १२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे आवश्यक पाईप्स व साहित्य आणण्यास सुरुवात झाली आहे. सदरचे सर्व साहित्य पोहताच योजनेच्या कामाचा शुभारंभ होईल, अशी माहिती जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच महेन्द्र साळवी तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली.
       याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, केन्द्र व राज्य शासनाने जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गतच्या १२६ कोटी खर्चाच्या नुतन पाणी पुरवठा योजनेस मान्यता दिली. याकामी महाराष्ट्र शासन तसेच राज्याचे महसूलमंञी ना.राधाकृष्ण विखे पा.यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले. 
       सदर योजनेनुसार प्रतिदिन दरडोई ५५ लिटर प्रमाणे शुध्द पाणीपुरवठा होणार आहे. योजनेत साठवण तलाव, जलशुध्दीकरण केंद्र, मुख्य वितरण टाकीसह वाड्या-वस्त्यांवर स्वतंञ वितरण टाक्यांंचा समावेश आहे. यामुळे गावासह सर्व वाड्या-वस्त्यांना सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. जुन्या पाईपलाईन काढून नविन सुमारे १४० कि.मी. एकुण लांबीच्या पाईपलाईन्स टाकल्या जाणार आहेत. सदरच्या योजनेमुळे गावाचा पुढील शंभर वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. योजनेसाठीचे साहित्य येण्यास सुरुवात झाली असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!