3.8 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

दुधाळ गायी घेण्यासाठी शेतकरयांना पन्नास हजाराचे अनुदान – खा.डाॅ.सुजय विखे पाटील

अहमदनगर (प्रतिनिधि) :-लम्पी आजाराच्या संसर्गात शेतकरयांच्या दुभत्या जनावरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून यामुळे दूधाचा व्यवसाय करणारा शेतकरी अडचणीत आला त्यामुळे केंद्र सरकारने दुधाळ दोन गायी विकत घेण्यासाठी शेतकरयास  पन्नास हजार रूपयाचे अनुदान देणार असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी जाहिर केले. एप्रिल महिन्यात याची नाव नोंदणी सुरू होणार असून त्या करिता लागणारे कागदपत्राची पुढील महिन्यात जुळवाजुळव करा असे यावेळी त्यांनी सांगितले. 
     अहमदनगर तालुक्यातील नेप्ती व वाकोडी येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते, या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले हे होते. 
       या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की लम्पी या आजाराचा संसर्ग मोठ्याप्रमाणात आला आणी आपल्या पशुधनाचे यात नुकसान झाले पर्यायाने आपला दूधाचा व्यवसाय हा तोट्यात गेला मात्र यावेळी आपल्या मदतीला राज्याचे पशुसंवर्धन व दूग्ध विकास मंत्री तथा आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे धाऊन आले आणि त्यांनी आपल्या गोठ्यात पशुवैद्यकीय आधिकारयास पाठवून संपूर्ण पशुधनाचे मोफत लसीकरण करून घेतले, राज्य सरकारने आपले पशुधन वाचवले तर दुसरीकडे देशाचे अत्यंत संवेदनशील पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या अडचणी जाणून शेतकरयास अशा परिस्थितीत  आधार देण्याचे ठरवून दोन दुधाळ गायी घेण्यासाठी पन्नास हजार रूपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. एप्रिल मध्ये हे अनुदान शेतकरयास मिळणार आहेत त्याची नोंदणी पुढील महिन्यात करण्यात येणार आहे.  
     2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना घरोघरी नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा शब्द दिला त्याच शब्दाची वचनपूर्ती सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगताना मागील तीन वर्षांत आपल्या राज्यात आघाडीचे सरकार असल्याने आपल्या कडे या योजनेंतर्गत काम होऊ शकले नाही, मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच अवघ्या तीन महिन्यांत जलजीवन मिशनचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आणि नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ देखील सुरू झाला असे सांगितले. आपले सरकार असल्यावर हा फायदा होतो असे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगून येणारया निवडणुकांत या सर्व गोष्टींचा विचार आपण जरूर करावा आणि पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदीजी यांना विराजमान करावे असे आवाहन त्यांनी केले. 
  अवघ्या तीन महिन्यांत आपले सरकार आल्यावर किती निधी आपण आणू शकलो हे सांगताना ते म्हणाले की मागच्या तीन वर्षांत एक रूपायाचा निधी हा आपल्या भागात आला नाही मात्र आता सर्वाधिक निधी हा या तीन महिन्यांत या तालुक्यात आला आहे, आपला तालुका हा आता रस्ते, पाणी, विज यात जिल्ह्य़ात सर्वात पुढे असेल अशी आपण या प्रसंगी ग्वाही देत असून तुम्ही फक्त आमच्या पाठीशी खंबीरपणाणी उभे रहा विकासाची गंगा आपल्या दारा पर्यंत आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
डाॅ.विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने तीनशे मुला-मुलींना यूपीएससी व एमपीएससी करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा विचार केला आहे, येत्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्याचा मानस असल्याचे खा. विखे यांनी सांगितले. 
   यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आपले विचार व्यक्त करून डबल इंजिनचे सरकार किती फायद्याचे आहे हे सांगितले. 
  या दोन्ही कार्यक्रमात रस्ते, दलित वस्ती सुधारणा, नळ पाणी पुरवठा तसेच इतर विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. 
या समारंभास पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!