22.3 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

अहमदनगर शहराच्या सुरक्षितेसाठी साडेतीन कोटी रूपयाचे सीसीटीव्ही यंत्रणा तसेच शिवसृष्टीचे शिवजयंतीस लोकार्पण-खा.डाॅ.सुजय विखे पाटील

अहमदनगर (प्रतिनिधि)
नगरशहरातील सुरक्षते दृष्टीने 35 ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याकरिता जिल्हा नियोजन मार्फत पोलीस व तुरुंग विभागाकरिता शहरातील अद्यावत करण्यासाठी 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच शहरातील उड्डाणपुलावर चित्ररूपात साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचे लोकर्पण 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त करण्यात येणार असल्याची  माहिती असल्याचे खा डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
खा.डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, नागरिकांच्या व शासनाच्या मालमत्तेचे रक्षण आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संशयास्पद लोक, वाहन, वस्तू इत्यादींवर लक्ष ठेवणे. अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाची सार्वजनिक ठिकाणी यांचे सतत निरीक्षण करणे, नगर येथील कमांड कंट्रोल सेंटर मध्ये नगर शहर, शिर्डी, शनिशिंगणापूर, राहाता या सर्व ठिकाणे पोलीस नियंत्रण्यात येणार असल्याने शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे खा.डॉ.विखे पाटील यांनी सांगितले. 
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास फुलांची सजावट करण्यात येणार असून, या बरोबरच अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाच्या खांबावरील छत्रपती शिवाजी महाराजाचे जीवनावरील विविध प्रसंग रेखटण्यात आलेल्या शिवसृष्टीचे लोकर्पण करण्यात येणार आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!