कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):-धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुण पिढीवर चांगले संस्कार होऊन सुसंस्कृत पिढी निर्माण होण्यास मदत होते.कोल्हार भगवतीपूर येथे होणा-या धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यातून संस्कारक्षम पिढीबरोबरचं संताच्या विचारांचा जागर होऊन मनशांती मिळते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
श्रीराम जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाजा यांच्यावतीने सुरु असलेल्या कथाकार ह. भ.प श्री नवनाथ महाराज म्हस्के श्री शिव महापुराण कथेला सहाव्या दिवशी सौ शालिनीताई विखे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या हस्ते ग्रंथ पूजन व ग्रंथ आरती करण्यात आली. यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक संचालक स्वप्निल निबे, उपसरपंच सविता खर्डे,भगवतीपूरचे सरपंच दत्ताञय राजभोज, कोल्हार बुद्रुक चे माजी सरपंच ज्ञानेश्वर खर्डे , माजी सरपंच श्रीकांत खर्डे , भरत खर्डे,स्वप्निल लोखंडे,श्रीकांत बेंद्रे कोल्हार भगवतीपुरचे पोलीस पाटील सुखलाल खर्डे अनिल बोरुडे ,गोरक्ष खर्डे , अक्षय मोरे,गणेश सोमवंशी उपस्थित होते.
यावेळी भाविकांशी संवाद साधताना सौ विखे पाटील म्हणाल्या श्रीराम नवमी निमित्ताने होणारा हा उत्सव गावच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तरुणांच्या माध्यमातून आज प्रत्येक गावात आध्यात्मिक कार्याची गरज आहे. तरुणांच्या माध्यमातून गावचा एकोपा कायम राहिला तर गाव विकासाकडे वाटचाल करेल आध्यात्मिक कार्यातून मोठी ऊर्जा ही मिळत असते आणि या माध्यमातूनच संतांचे विचार पोहोचले जातात आणि या माध्यमातून एक आदर्श समाज निर्मिती होऊन गावच्या विकासालाही याचा हातभार लागतो असे त्यांनी सांगून या उपक्रमाचे आणि आयोजकांचे त्यांनी कौतुकही केले.
कथाकार हभप . नवनाथ महाराज म्हस्के यांनी शिवपुराणातील विविध प्रसंग या निमित्ताने भाविकांना सांगत शिवपुराण शिवपुराणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमास कोल्हार भगवतीपुर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



