spot_img
spot_img

जलशुद्धीकरण प्रकल्प की कचरा डेपो ? आमदार कटके यांचा सवाल; शिरूरमधील केंद्राच्या दुरवस्थेमुळे संतप्त

शिरूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-“सगळ्या बाजूंनी घाण आणि कचऱ्याचा वेढा पडलेला असताना कुणी लक्ष द्यायला आहे की नाही ? इथल्या कामकाजावर कुणाचा अंकुश आहे की नाही ? स्वच्छता नसेल,नियोजन नसेल आणि प्रत्येक नागरिकाला पाणी पिण्यासाठी घरी पाण्याचा जार आणावा लागत असेल किंवा घरगुती फिल्टर लावावा लागत असेल तर या असल्या जलशुद्धीकरण योजनेचा काय फायदा ? हा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे की कचरा डेपो ?”असे संतप्त सवाल आमदार माउली कटके यांनी येथे केले.

आमदार कटके यांनी शनिवारी (ता.५) अचानक सिद्धीच्या पहाडाजवळील शिरूर नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले होते.बांधकाम साहित्याचा राडारोडा पडलेला,भंगार साहित्य इतस्ततः पसरलेले, क्लोरीनच्या मोकळ्या गोण्या सर्वत्र विखरून पडलेल्या, जलशुद्धीकरण केंद्रात घोडनदीवरून आणलेल्या पाण्याची दुर्गंधी पसरलेली पाहून त्यांनी संताप व्यक्त केला.

जलशुद्धीकरण केंद्रावर कुणीही जबाबदार अधिकारी जलशुद्धीकरण केंद्र परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारमार्फत भरीव निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. सिद्धीच्या पहाडावरील निसर्गरम्य परिसरात हे केंद्र असल्याने निधीची वाट न पाहता तातडीने या सर्व परिसराची स्वच्छता करून या परिसरात हिरवळ फुलवली जाईल.

जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या वेस्टेज वॉटरवर वनराई उभी करण्याचे नियोजन तातडीने केले जाईल. त्यासाठी नगर परिषदेने तातडीने आराखडा तयार करावा.

माउली कटके, आमदार तेथे उपस्थित कर्मचाऱ्याला जुजबी माहिती देखील देता आली नाही. त्यामुळे आमदार कटके यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना फैलावर घेतले. नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

शिरूर शहरातील नागरीकांना पिण्यासाठी पाण्याचे जार घ्यावे लागत असतील तर ही योजना काय कामाची ?एवढ्या मोठ्या शहरासाठीची एवढी मोठी योजना असताना आणि तिच्यावर मोठी योजना असताना आणि तिच्यावर मोठा खर्च केला जात असूनही तिची अवस्था अशी असेल तर ती बंद केलेली बरी, असेही ते म्हणाले. इथल्या भोंगळ कारभारावर कुणाचा अंकुश आहे की नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष एजाज बागवान, स्वप्नील रेड्डी, अतुल गव्हाणे, हर्षद ओस्तवाल, वसीम शहा आदींसह शहरातील कार्यकर्ते त्यांच्यासमवेत होते.

दरम्यान, नगर परिषद पाणी पुरवठा विभागातील लिपिक भूषण कडेकर यां जलशुद्धीकरण केंद्रावर धाव घेत कटके यांना तेथील स्थितीविषयी अवगत केले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!