3.8 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

स्वतः बनवलेले जेवण केल्यानंतर शैक्षणिक सहलीला निघालेल्या मुलांना त्रास

दर्यापूर (जि.अमरावती) आदर्श हायस्कूल येथील 230 मुले व १५ शिक्षक शैक्षणिक सहलीला निघाले आहेत. दि.१६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी शेवगाव (जि.अहमदनगर) येथे स्वत:बनवलिलेले जेवण केल्यानंतर रात्री देवगडकडे जाणार होते. रात्री १० वाजता त्यांच्यापैकी ८४ मुले व ४ शिक्षकांना त्रास जाणवल्यास लागल्याने त्यांना शिर्डी येथील साईनाथ रूग्णालयात ॲडमीट करण्यात आले. सध्या सर्व ८४ मुले व ४ शिक्षकांची प्रकृती उत्तम आहे. 
या घटनेची दखल घेत मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा.पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एकाच व्हिडिओ कॉलद्वारे आज मुले व शिक्षकांशी संवाद साधला. 
मुख्यमंत्री व पालकमंत्री महोदयांनी यावेळी,  शिर्डी प्रांतधिकारी गोंविद शिंदे व रूग्णालय अधीक्षक डॉ.प्रितम वडगावे यांना मुले व शिक्षकांच्या प्रकृतीची सर्वातोपरी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते.
सध्या मुलांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नसल्याचे रूग्णालय अधीक्षकांनी कळविले आहे.
स्थानिक  व रूग्णालय प्रशासन दर्यापूर (जि.अमरावती) प्रशासनाशी संपर्कात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!