नवी मुंबई ( जनता आवाज वृत्तसेवा):-भारतीय जनता पार्टी मधील प्रत्येक तोलामोलाच्या कार्यकर्त्यानी विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या मेहनतीमुळे राज्यात पुन्हा महायुतीची सता येवू शकली.राज्यातील जनतेचा मिळालेला जनाधार खूप ऐतिहसिक असल्याचे मत प डॉ विठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या नवी मुंबई अध्यक्षा व भारतीय जनता पक्षाचे महिला सरचिटणीस सौ अनुजा साळवी यांनी व्यक्त केले.
भाजपा स्थापना दिना निमित आयोजित “मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात प डॉ वि विखे पाटील कृषी परिषदेच्या जनसंपर्क कार्यालयातून कार्यकरत्यांसमवेत सहभागी झाले.
सदस्य नोंदणी अभियानात राज्यात दिड कोटी सदस्य करताना सर्वात जास्त सदस्य नोंदणी करण्यात दिलेल्या योगदाना बद्दल कार्यकर्ते चे अभिनंदन करून सौ अनुजा साळवी म्हणाल्या की विधानसभा निवडणुकीत सर्वानी घेतलेल्या परीश्रमामुळे जिल्हयात महायुतीला मोठे यश मिळू शकले.
महायुती सरकारने योजनांच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला.सुरू केलेली एकही योजना बंद होवू दिलेली नाही.महाविकास आघाडी कडून काही आरोप होत असले तरी भाजपाच्या कार्यकर्त्यानी आत्मविश्वासाने निवडणुकीत आघाडीच्या विरोधात केलेली लढाई महत्वाची ठरली.
विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ३७० कलम हटविण्याचा महत्वपूर्ण निर्णय केला.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्फ बोर्डच्या संदर्भात सुधारणेचे विधेयक मांडून नवी सुरूवात केली असल्याचे सांगून या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्याचे अभिनंदन केले.
भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवसाच्या निमिताने सौ अनुजा साळवी यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात यांनी पक्षाचा झेंडा फडकावला आणि कुटूबांसह सेल्फी काढले.
यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कार्यकर्त्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे साधलेल्या संवादाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले.



