शिर्डी दि. १६ प्रतिनिधी
श्री साईबाबा आंतराष्ट्रीय विमावतळावर नाईट लॅण्डींग सुविधेला परवानगी मिळाल्याबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले असून समृध्दी महामार्ग वंदे भारत एक्सप्रेस आणि आता नाईट लॅण्डीग सुविधेतून विकासाची हॅट्रीक साधली गेली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
शिर्डी आंतराष्ट्रीय विमानतळावर नाईट लॅण्डीग सुविधेचा निर्णय घेत्ल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.गेली अनेक दिवसांची मागणी केंद्र सरकारने मंजूर करून साईभक्तांना मोठा दिलासा असल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली.
शिर्डी विमानतळ सुरू झाल्याने भाविकांना दर्शन सुविधेसाठी येणे सोयीचे झाले.परंतू नाईट लॅण्डींग सुविधा सुरू व्हावी ही मागणी प्रामुख्याने होती.राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीला मोठे यश मिळाल्याने भाविकांना शिर्डीत येणे अधिक सुकर होणार अस्लयाचे विखे पाटील म्हणाले.
शिर्डी करीता लागोपाठ तीन विकासात्मक गोष्टीची उपलब्धी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने झाली असून समृध्दी महामार्ग त्यांनतर मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आणि आता नाईट लॅण्डीग सुविधेचा झालेला निर्णय ही विकासाची हॅट्रीक ठरली असल्याचे विखे पाटील म्हणाले.
शिर्डीत हवाई रेल्वे आणि समृध्दी महामार्गाची सुरूवात शिर्डीसह इतरही तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी द मोठी बाब असून जिल्ह्याच्या अर्थकारणावरही याचे सकारात्मक परिणाम होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.