संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-तालुक्यातील अंभोरे गावातील वीज, पाणी, रस्त्याचे मूलभूत प्रश्न सोडवण्या साठी कटिबद्ध राहिल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी अंभोरे करांना दिला.
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील अखंड हरिनाम सप्ताह आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली त्यावेळी सप्ताह कमिटीच्या वतीने आ खताळ पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी अंभोरे गावातील वीज, पाणी, रस्त्याचे प्रश्न अत्यंत गंभीर झाले अस ल्याचे आ.अमोल खताळ यांचे निदर्शनास आणून दिले असता त्यांनी हे प्रश्न मार्गी लावु असे अश्वासित केले., यापुढे अंभोरे गावच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व मी नेहमी कटीबद्ध राहील, अध्यात्मिक, सामाजिक, कृषी अशा सर्वच क्षेत्रातील विविध कामे मार्गी लावणार आहेत असे असे आश्वासन दिले
याप्रसंगी संपत गोविंद खेमनर,अनिल शिवराम खेमनर,अँड.संदीप जगनर शिवाजी खेमनर,रावसाहेब रावजी सोपान राधू खेमनर, उमा मारुती खेमनर, बाबु राव गवाजी खेमनर, नागेश भास्कर हळनर, देवराम पुणेकर, रमेश बलसाने, नकाजी कडनर, दीपक कडनर, यांच्या सह सर्व ग्रामस्थ भजनीं मंडळ, मोठ्या संख्येने उपस्थित होते
सोलर पंपामुळे शेतीला दिवसा पाणी देणे शक्य होणार आसल्याने ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे असे मत आमदार अमोल खताळ यांनी याच गावातील प्रगतशील शेतकरी शरद शिवाजी खेमनर यांच्या शेतात मुख्यमंत्री सोलर कृषी पंपाचे उद्घाटन करून झाल्यानंतर केले आणि सोलर पंपासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असेआवाहन त्यांनी केलेयावेळी अंभोरे पंचक्रोशीतील भाविक भक्त, ग्रामस्थ, महायुतीचे पदाधिकारी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.”



