कोपरगाव शहर( जनता आवाज वृत्तसेवा ):-क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त बहुजन शिक्षण संघ अहिल्यानगर पुस्तक मार्केट पब्लिकेशन्स (नारायणगाव), सुजात फाउंडेशन (संगमनेर) आयोजित भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि कालकथित दादासाहेब रुपवते जन्म शताब्दी सोहळ्यानिमित्त संगमनेर येथे मालपाणी लॉन्स याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये कोपरगाव तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व अहमदनगर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कक्ष अधिकारी सी.बी. गायकवाड यांना नुकतेच कालकथित आदरणीय दादासाहेब रुपवते कार्यकर्ता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
याप्रसंगी या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड.संघराज रुपवते या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीरामपूरचे जेष्ठ कवी तथा माजी आमदार लहू कानडे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध विचारवंत प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर,प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,तर सदर कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, व वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुध्द व महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा कालकथित दादासाहेब रुपवते जन्मशताब्दी महोत्सव कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर माजी आमदार बाळासाहेब थोरात तसेच मा.आमदार लहू कानडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यानंतर सत्कार समारंभानंतर उपस्थित सर्व पुरस्कारती व त्यांच्या नातेवाईकांन करिता मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती
त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व पुरस्कार कर्त्यांचा सन्मान उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शाल व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देतांना सी.बी गायकवाड म्हणाले की हा एक हृदयस्पर्शी असा हा सन्मान मिळाल्याने खऱ्या अर्थाने कालकथित आदरणीय दादासाहेबांना हि एक आदराची आदरांजली ठरेल असे पुरस्कार प्राप्त आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सी.बी गायकवाड हे आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देतांना म्हणाले की आदरणीय दादासाहेबांन सोबत काम करण्याची संधी १९६६ च्या दशकांत मिळाली.
त्यावेळेस मी अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये अर्थ विभागात लिपिक म्हणून हजर झालो होतो. त्यानंतर १९८१ च्या दरम्यान भंडारदरा येथे जेतवन बुध्द विहाराची निर्मिती झाली आणि त्या विहाराच्या कमिटी मध्ये उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दादासाहेबांनी माझ्यावर दिली तसेच बहुजन शिक्षक संघाच्या कोपरगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृहाच्या कमिटीवर निमंत्रित सदस्य म्हणून १९७६ ते १९९९ पर्यंत मी काम केले दादासाहेब १९७२ ते १९७५ या काळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करत होते १९७२ च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली याच काळात पालेमोड योजनेचा आधार घेत तालुक्यातील विडी कामगारांकडून एक एक रुपया गोळा करून अकोले महाविद्यालयाची मुहूर्त मेड रोवली आदरणीय दादासाहेब हे लेखक संपादक म्हणून त्यांनी प्रबुध्द भारत आणि मराठी विश्वकोशचे संपादक म्हणून त्यांनी काम केले अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत मात्र वेळे अभावी सांगणे कठीण आहे असे सी.बी.गायकवाड शेवटी म्हणाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान अहिरे यांनी केले तर आभार ॲड.संघराज रुपवते यांनी मानले.



