spot_img
spot_img

जय बजरंग बलीच्या जयघोषाने कोल्हार नगरी दुमदुमली

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा ):- शनिवार दि. 12 एप्रिल रोजी येथील हनुमान मंदिरामध्ये सकाळी ठीक 6 वा. सूर्योदया च्या वेळी विधिवत मूर्ती पूजन तसेच अभिषेक करून सामुदायिक आरती करण्यात आली. श्री भगवती माता देवालय ट्रस्टचे विश्वस्त  वसंतराव खर्डे पा. व श्री विजय निबे पा.यांना अभिषेक तसेच आरती चा मान मिळाला. त्यानंतर श्री विजय डेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक श्री राम रक्षा स्तोत्र व श्री हनुमान चालीसा पठण सेवा झाली. असंख्य भाविक भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने श्रीरामपूर येथील प्रसिद्ध स्नेहमाला डान्स अँड ड्रामा अकॅडमी चा 21 कलाकारांसह पंचमुखी हनुमानाचे जिवंत सादरीकरण हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला.याप्रसंगी कोल्हारचे मा. सरपंच ॲड. सुरेंद्र पाटील खर्डे, उद्योजक अनिल हिरानंदानी, प्रवरा कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक श्रीकांत खर्डे व ज्ञानेश्वर खर्डे , कोल्हार बुद्रुकचे माजी उपसरपंच स्वप्निल निबे, नागपूर पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य ऋषिकेश खांदे, कोल्हार भगवतीपुरचे सरपंच दत्तात्रय राजभोज कोल्हार भगवतीपुरचे उपसरपंच प्रकाश खर्डे, शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी उत्तर अहिल्यानगर सुनिता शेळके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्याम गोसावी बापूसाहेब देवकर, प्रवरा सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक शेठ आसावा, पत्रकार गणेश सोमवंशी,लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक वनवे साहेब कोल्हार पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल चव्हाण पल्लवी धनवटे ओम शांती केंद्राच्या ब्रह्मकुमारी स्वाती बहनजीं यांच्या हस्ते नारळ वाढवून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली,दरम्यान संध्याकाळी ठीक सहा वाजता कोल्हार चे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरासमोर या ग्रुपने पंचमुखी हनुमानाच्या जिवंत देखाव्याचे सादरीकरण केले याला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून दाद दिली. हनुमान मंदिरा समोरून भव्य सवाद्य तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणुकीला मोठया उत्साहात सुरुवात झाली. मिरवणुकीतील सर्व बाल गोपालांना केसरी कलर चे पेठे बांधण्यात आले.

मिरवणुकीत सामील झालेल्या महिला व पुरुषांना जय श्रीराम असे प्रिंट असणारे केसरी कलरचे स्कार्प बांधण्यात आले मिरवणूक मार्ग प्रथम वंदे मातरम चौक,बेलापूर रोडवरील शिवाजी महाराज चौक, ZK कॉम्प्लेक्स मधील कल्याणी साडी चौक त्यानंतर स्व.माधवराव खर्डे पाटील चौक अशा वेगवेगळ्या चौकात सादरीकरण करून प्रेक्षकांची मोठी वाहवा मिळवली याप्रसंगी त्यानंतर मिरवणूकची महादेव मंदिरासमोर शेवटचे सादरीकरण करून सांगता करण्यात आली.

याप्रसंगी शिव प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुरज भाऊ आगे व त्यांच्या सहकारी मित्रांनी आवर्जून हजेरी लावली. हनुमान जन्मोत्सव समितीने यावेळी मोठ्या प्रमाणात बुंदीचे पॅकेट करून प्रसाद वाटप केले. .तसेच हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने कोंची येथील गोशाळेला छोटा टेम्पो भरून हिरवा चारा देण्यात आला. 2007 सलापासून दर शनिवारी सामुदायिक श्री गणपती स्तोत्र श्री राम रक्षा स्तोत्र श्री मारुती स्तोत्र श्री हनुमान चालीसा श्री कालभैरवाष्टक पसायदान घेऊन शेवटी समस्त हिंदूंची प्रार्थना म्हणजे श्री मंत्रपुष्पांजली ही आजपर्यंत अखंडितपणे(सलग 787 आठवडे)पठण केली जात आहे.

या धार्मिक उपक्रमाची प्रेरणा घेत जवळजवळ 81 गावांमध्ये सामुदायिक हनुमान चालीसा पठणा चा उपक्रम दर शनिवारी सुरू झाला आहे. तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे कोल्हार येथील राहणारे परंतु सध्या इंग्लंड ऑस्ट्रेलिया कॅनडा इंडोनेशिया सिंगापूर या देशांमध्ये स्थायिक असलेल्या भक्तगणांकडून तेथे देखील दर शनिवारी सामुदायिक श्रीरामरक्षा स्तोत्र व श्री हनुमान चालीसा पठण ही सेवा घेतली जाते.

तरी या 25 मिनिटाच्या सामुदायिक सेवेसाठी प्रत्येक घरातून आपला पाल्य दर शनिवारी मंदिरामध्ये पाठवावा असे हनुमान जन्मोत्सव समितीतर्फे आवाहन करण्यात येत आहे या धार्मिक उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हनुमान जन्मोत्सव समितीचे महिला पुरुष तसेच बालगोपाल असे सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!