दिल्ली (विशेष प्रतिनिधी):लोकसभेत देशाच्या वित्त मंत्री निर्मला सितारामणजी यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना दिलासाच देणारा तसेच सहकार क्षेत्रास चालना देणारा असा हा अर्थसंकल्प म्हणावा लागेल, विरोधकांनी दरवर्षी प्रमाणेच सभागृहात न बसता, न ऐकता आपली ठरवलेली प्रतिक्रिया दिली असल्याचे खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.
या वर्षीच्या या अर्थसंकल्पात काही खास वैशिष्ट्ये असल्याचेही सांगताना सर्व समावेशक आणि देशाच्या अर्थ व्यवस्थेचा सर्वांगीण विकास साधणारा असा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी प्रामुख्याने सहकार क्षेत्रासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून यामुळे देशातील सहकार क्षेत्रास चालना मिळणार आहे. सर्वसामान्यासाठी कर सवलत ही देखील मोठी बाब असून सात लाख रूपयांची मर्यादा यावेळेस करदात्यांठी केल्याने मोठ्या संख्येने असलेल्या सर्वसामान्यांची आता बचत ही वाढेल. ही बचत देशाच्या अर्थकारणासाठी लक्षणीय ठरणारी आहे. सभागृहात अर्थसंकल्प मांडत असतानां विरोधक हे उपस्थितच नव्हते त्यामुळे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रीया ह्या दरवर्षी देण्यात येणारया प्रतिक्रीये सारख्याच आहेत.
या अर्थसंकल्पामुळे देशाची अर्थव्यवस्था ही आधिकाधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.