20.6 C
New York
Tuesday, September 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

पाण्याचे संवर्धन आणि पुर्नवापर करण्याचा पर्याय स्विकारला तरच पाण्याच्या टंचाईवर मात करणे शक्य होईल- माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-उपलब्ध पाण्याचे संवर्धन आणि पुर्नवापर करण्याचा पर्याय स्विकारला तरच पाण्याच्या टंचाईवर मात करणे शक्य होईल. कोणत्याही धरणाच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतक-याला पाणी मिळेल अशी जलनीती अमलात आणण्याची गरज असल्याचे मत माजी पाटबंधारे मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी व्यक्त केले.

जलसंपदा विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधवड्याचा शुभांरभ आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते जलपुजन करुन करण्यात आला. या निमित्ताने काढण्यात आलेल्या जनजागृती रथाचेही आयोजन करुन, हा रथ मार्गस्थ करण्यात आला. उपस्थित शेतक-यांना जलप्रतिज्ञा देवून पधरवड्यातील विविध उपक्रमांची माहीती देण्यात आली.

या कार्यक्रमास सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, चेअरमन नंदू राठी, माजी सभापती बापूसाहेब आहेर, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, अॅड. रघुनाथ बोठे, प्रांताधिकारी माणिकराव आहेर , तहसिलदार अमोल मोरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता हारदे, संभाजी पाटील, तालुका कृषि आधिकारी आबासाहेब भोरे आदी याप्रसंगीउपस्थित होते.

आपल्या भाषणात आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले की, जलसंपदा विभाग हा समाजाची आणि शेतक-यांची सेवा करणारा विभाग आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विभागाला लोकाभिमुख बनविण्याचे काम सुरु केले आहे. याचाच भाग म्हणून पंधरवड्यातील उपक्रम हे जनजागृतीसाठी उपयुक्त ठरतील.

सद्य परिस्थितीत पाणी निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आहे. गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर होवू लागल्यामुळेच एका भागात पाणी तर दुसरा भाग पाण्यापासून वंचित अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वारेमाप पाण्याचा होणारा उपसा अति घातक असून, यामुळे आपण नैसर्गिक संपत्तीची एकप्रकारे हानी करुत असून, याकडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले की, शेवटच्या शेतक-याला पाणी मिळेल अशी व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागणार आहे. पाणी मागणी फॉर्म भरण्यात असलेली उदासिनता, कालव्यांची होत नसलेली दुरुस्ती यामुळे शेती पिकांना पाणी देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. प्रत्येक पिकाला ठराविक वेळेला पाणी मिळालेच पाहीजे तर उत्पादकतेमध्ये वाढ होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

कॅनॉल इन्सपेक्टर पासून ते शाखा अभियंत्यापर्यंत पाण्याच्या संवर्धन आणि संरक्षणाची जबाबदारी असली तरी, मनमुराद पाणी वापरण्याचे दिवस आता राहीले नाही. उपलब्ध पाण्याचा सर्वांनाच लाभ होईल यासाठी आता स्वतःवरच काही बंधन घालून घेण्याची गरज व्यक्त करुन, म्हस्के पाटील म्हणाले की, आपल्या जिल्ह्यातील धरणांच्या कालव्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. यामुळे पाण्याची वहन क्षमता वाढेलच परंतू भविष्यात आता अतिरिक्त पाणी निर्माण करण्याच्या प्रयत्नांना यश येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डाळींब रत्न बाबासाहेब गोरे यांनी आपल्या भाषणात या पंधरवड्याच्या उपक्रमाचे कौतूक करुन, शेती आणि पाणी यांचा असलेला जवळचा संबध लक्षात घेवून जल व्यवस्थापनास प्राधान्य देणे खुप गरजेचे होते. मंत्री ना. विखे पाटील यांनी नेमक्या याच विषयाला जलसंपदा विभगाच्या माध्यमातून उपक्रमाचा भाग बनविला. पाण्याचे स्त्रोत मर्यादीत झाले आहेत. पाण्याचा वाढता उपसा हा जमीनीलाही घातक आहे. त्यामुळेच पाण्याचा लेखाजोखा मांडण्याची आता वेळ आली असून, आजचे मरण उद्यावर ढकलून चालणार नाही. गोदावरीच्या तुटीच्या खो-यात पाणी उपलब्ध करण्याच्या संकल्पनेला मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून मुर्त स्वरुप येईल असे सांगून या उपक्रमात युवकांचा सहभाग अधिक वाढावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तालुका कृषि आधिकारी आबासाहेब भोरे यांचीही भाषण झाली. उपस्थित शेतक-यांनी या उपक्रमासाठी आपल्या सुचना मांडल्या. या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!