2.5 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्या मुळे लोणी-व्यंकनाथ रस्त्यासाठी साडेतीन कोटी मंजूर

दिल्ली( विशेष प्रतिनिधी) :नगर-दौंड महामार्गावरील लोणी व्यंकनाथ येथील, बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या रेल्वे फाटका जवळील रस्त्यासाठी साडे तीन कोटी रूपये मंजूर झाले असल्याचे खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. 
  दिल्ली येथील रस्ते,परिवहन आणि महामार्ग विभागात संपन्न झालेल्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली.  
     दिल्ली येथे संपन्न झालेल्या या बैठकीत खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांच्यासह रस्ते परिवहन आणि महामार्ग विभागाचे अतिरिक्त सचिव व वित्त सल्लागार संजय कुमार, वित्त विभागाचे मुख्य सल्लागार जी व्यंकटेश, रस्ते परिवहन विभागाचे सल्लागार सुधिर कुमार जैस्वाल, वित्त विभागाचे ए.के.डे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
    या बैठकी नंतर बोलताना खासदार डाॅ.सुजय विखे पाटील म्हणाले, की महामार्ग क्रमांक १६०, अहमदनगर दौंड रस्त्यावरील लोणी व्यंकनाथ येथील रेल्वे फाटका जवळील रस्त्याचे काम बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. या कामाचा आढावा घेतल्या नंतर आपण याबाबत नवी दिल्ली येथे रस्ते परिवहन आणि महामार्ग विभाग, वित्त विभाग तसेच सल्लागार समिती यांची एकत्रित बैठक घेतली या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करून प्रलंबित असलेल्या रस्त्यामुळे दळणवळणा बरोबरच होणाऱ्या दूर्घटना रोखण्यासाठी ह्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावरून या बैठकीत तिन्ही विभागाने या करिता आवश्यक असलेल्या साडेतीन कोटी रूपयाच्या निधीस मान्यता दिली असून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम पुढिल दोन दिवसात सुरू होणार असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले. 
    दरम्यान या तीनही विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतल्या बद्दल जनतेनी खासदार डाॅ.सुजय पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!