25 C
New York
Wednesday, August 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

यावर्षीचा ‘शंकरनाना खर्डे पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार२०२३’ सौ. लता टावरे यांना आदर्श शिक्षिका व श्री दिपक मगर यांना आदर्श शिक्षक


जनता आवाज 
कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार भगवतीपूर येथील शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक सेवा संघटनेच्यावतीने स्वर्गीय शंकरनाना खर्डे पाटील यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी प्रजासत्ताक दिनी दिला जाणार जाणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२३ यंदा रयत शिक्षण संस्थेच्या कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका सौ. लता अनिलराव टावरे यांना प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्रदान करताना ॲड सुरेंद्र खर्डे पाटील व इतर मान्यवर

 त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्कार कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक दीपक मच्छिंद्र मगर यांना देण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. शैक्षणिक बाबींबरोबरच विद्यार्थी – विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्व विकास, गुणवत्ता वाढ, विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती आदि कामात अग्रणीय कार्य केल्याबद्दल सौ. लता टावरे आणि दीपक मगर यांना उपरोक्त पुरस्कार देण्यात आला.
      कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच व स्थानिक स्कूल समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेंद्र खर्डे यांच्याहस्ते तसेच शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष अजित मोरे, कार्यकारी अभियंता श्याम मिसाळ, श्रीमती सुशीला मिसाळ, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे, प्राचार्य सुधीर वाघमारे, उपप्राचार्य अरुण गोऱ्हे, पर्यवेक्षिका श्रीमती संजीवनी आंधळे, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी, बी. के.खर्डे, सुधाकर काळे, पांडुरंग देवकर, अमोल खर्डे, शिवाजी निकुंभ, संजय दळवी आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!