spot_img
spot_img

नेवाशात बिबट्याच्या हल्लात शेतकरी गंभीर जखमी! जिल्ह्याचे वनपरिक्षेञ अधिकारी अविनाश तेलोरे यांनी दिली घटनास्थळी भेट! आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी जखमी शेतकऱ्याला धीर देत बिबट्याला जेरबंद करण्याचा वनविभागाला दिला आदेश!

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा): – ऊसाच्या शेतात पाणी पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने बुधवारी सकाळी जोरदार हल्ला चढवत शेतकऱ्याला गंभीर जखमी केल्याची घटना मडकी (ता.नेवासा) येथील थोरात वस्तीवर घडली असून बिबट्याच्या हल्यात शेतकरी मच्छिंद्र मुरलीधर थोरात हे गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घाबरट पसरली असून बिबट्याच्या धास्तीमुळे वाड्यावस्तीवरील शेतकऱ्यांची मोठी पाचावरधारण बसली आहे

या घटनेची माहीती मिळताच जिल्ह्याचे वनपरिक्षेञ अधिकारी अविनाश तेलोरे,नेवासा वनविभागाचे वनपाल व्ही.एम. गाढवे,वनरक्षक डी.जि.धुळे,आर.एम.शिसोदे यांच्यासह वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मडकी (ता.नेवासा) येथे घटनास्थळी भेट देवून वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा माग शोधत त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला असून या बिबट्याला लवकरच जेरबंद करण्यासाठी वनविभागाने युद्धपातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,मडकी (ता.नेवासा) येथे थोरात वस्तीवरील मच्छिंद्र मुरलीधर थोरात यांनी मंगळवार (दि.१५) रोजी राञीची विज असल्यामुळे त्यांनी ऊसाच्या सरीत पाणी सोडलेले असल्यामुळे बुधवारी सकाळी (दि.१६) रोजी किती सऱ्यात पाणी भरले हे पाहण्यासाठी गेलेल्या शेतकरी मच्छिंद्र थोरात याच्यावर बिबट्याने झडप मारली यामध्ये या शेतकऱ्याच्या दंडावर पंजा मारल्यामुळे या शेतकऱ्याला तीस टाके पडलेले असून कंबरेला ५ – ६ टाके पडलेले असल्यामुळे या बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी थोरात हा गंभीर जखमी झाला आहे घटनेची माहीती मिळताच जिल्ह्याचे वनपरिक्षेञ अधिकारी अविनाश तेलोरे यांनी नेवासा वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देवून बिबट्याच्या ठशांचा मार्ग शोधत त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला आहे.

या घटनेची माहीती मिळताच आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी मडकी येथे भेट देवून जखमी शेतकऱ्याची भेट घेवून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जखमी शेतकऱ्याला शासनाच्या नियमाप्रमाणे मदत करुन बिबट्याला लवकरच जेरबंद करण्याचा सुचना दिल्या यावेळी देवगडचे सरपंच अजय साबळे,चेअरमन शिवाजीराव मते यावेळी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!