संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- जवळे कडलग ते वडगाव लांडगा रस्त्याच्या कामासाठीचा निधी अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या कार्यकाळात मंजूर झालेला आहे . त्यासाठी पाठपुरावा आ अमोल खताळ यांनी केला आहे.त्यामुळे या कामाचे श्रेय इतरांनी घेण्याचा केविल वाणा प्रयत्न करू नये घेऊ नये अशी टीका भाजपचे माजी उपाध्यक्ष आणि आमदार अमोल खताळ यांचे खंदे समर्थक बापू साहेब देशमुख यांनी केली आहे.
संपूर्ण राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात लोककल्याणकारी योजना राबविल्या जात असून विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरूझाली आहेत . आ अमोल खताळ यांनी पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून तालुक्यासाठी निधी आणत आहेत .अमुक अमुक काम मंजूर होणार आहे असे त्यांना समजताच लगेच त्याचे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल करणार आणि काम मंजूर झाल्यावर माजी आमदारांच्या प्रयत्ना यश असे पत्रक काढले जाते अन लोकांची दिशाभूल केली जाते. जनता एवढी दूध खुळी नाही.
४० वर्ष ह्या जनतेने तुमचा नाकर्तेपणा अनुभवला आहे , त्यामुळे तुम्ही किती पत्रक काढा तरी त्याला काही फरक पडत नसल्याची टीका देशमुख यांनी केली.
ज्या माजी जिल्हापरिषद सदस्यांनी आणि माजी पंचायत समिती सदस्याने काल पत्रक काढून जवळे कडलग वडगाव लांडगा रस्त्याचे मोघम श्रेय घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याच्या मालकीच्या कंपनीचे जवळे कडलग गावात चालू असलेले जलजीवन मिशन कामा अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे. जवळेकडलग गावातील अनेक रस्ते त्यांनी स्वतःच्या धंद्यासाठी फोडले. आणि पुन्हा नीट पण केले नाही. तसेच गावातील जलजीवन मिशनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला माया कमवली. गावातील काही लोकांना कोर्टाची आर्डर असताना गोरगरीब लोकांचे रस्ते कित्येक वर्ष दादागिरी करून बंद ठेवलेत . अशा लोकांनी रस्त्यावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार असल्याची टीका बापू साहेब देशमुख यांनी केले.
निर्मिती कंट्रक्शने जवळे कडलग धांदरफळ अतिशय निकृष्ट दर्जाच्या झालेल्या रस्त्याबद्दल पत्रक काढण्याची हिंमत करावी… ज्या रस्त्याला साइडपट्टी आणि साइड गटारीचे काम न करता पैसे खाल्ले रस्त्याचे कार्पेट तर जणू इस्टीमेट मधेच नाही. तसेच निर्मिती कंट्रक्शनच्या मालकाने उद्घाटन केलेले जवळे कडलग गावातील इतरही निकृष्ट रस्ते माजी आमदाराच्या लोकांनी केलेत की जे २ वर्षात त्या निकृष्ट रस्त्यांची काय परस्थिती आहे त्यावरती पहिले पत्रक काढा असा सवाल देशमुखांनी उपस्थित केला. आपल्या साहेबाच्या ४० वर्षाच्या नाकर्त्यापणावर पण एखादे पत्रक काढण्याची हिंमत करावी.
यांनी माजी आमदारांच्या जीवावर तालुक्यात दुकानदारी टाकली आणि त्या दुकानदारीतूनच त्यांचा पराभव झाला त्यांनी आ अमोल खताळ यांच्यावर विनाकारण खोटे आरोप करून आपल्या नेत्यांना खुश करून आपली संपलेली दुकानदारी वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न हे पत्र काढून केला आहे का ? आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभव दिसत असल्या कारणाने हे लोक विकास कमानी व्यथित झाले आहेत. तुमच्या नेत्याची दुकानदारी तर संपलीच आहे आत्ता तुमची ही दुकानदारी संपण्याच्या मार्गावर आहे जर हा रस्ता माजी आमदारांनी मंजूर केला आहे असे ते म्हणत असेल तर: त्याचे काम पूर्ण करण्यास त्यांना मुहूर्त सापडत नव्हता का अशा शब्दात बापूसाहेब देशमुख यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्या वर टीका केली.
आमदार अमोल खताळांच्या नेतृत्वात तालुक्यात जे विकास पर्व चालू झाले आहे त्यामुळे माजी आमदार व त्यांचे बगल बच्चे व्यथित झाल्यासारखे वाटत आहे



