लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.धर्म विचारून हत्या करणे अतिशय संतापजनक असून, पर्यटकांच्या क्रुरपणे झालेल्या हत्येचा जबाब भारता कडूनही तेवढ्याच आक्रमकतेने देवून घटनेमागील सूत्रधार पंतप्रधान मोदी शोधून काढतील आशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात माध्यमाशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,धर्म विचारून हत्या करण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय आणि संतापजनक आहे.या अतिरेकी हल्याचा करावा तेवढा निषेध कमीच असून याविरोधात देशात संतप्त भावना उमटली असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.दोन दिवसात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी स्व:ता जावून घटनेचा आढावा घेवून पर्यटकांना दिलासा दिला आहे.जखमी पर्यटकांची त्यांनी रुग्णालयात जावून विचारपूस केली.
राज्यातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळ यांच्या माध्यमातून विशेष विमानाचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.
अतिरेकी हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तिंच्या कुटूबियांना पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.कोणत्याही अर्थिक मदतीने झालेली जीवीत हानी भरून येवू शकत नाही.पण या हल्ल्याचा जबाब तेवढ्याच आक्रमकतेने दिल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही आशी भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.



