लोणी दि.२४ प्रतिनिधी
गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धा या महत्वपूर्ण आहेत. शैक्षणिक ज्ञानाबरोबरचं विद्यार्थ्याना स्पर्धेतून प्रेरणा आणि दिशा मिळते. यश आणि अपयशाची चिंता न करता स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी अनुभव घ्यावेत कारण अनुभवातूनच जीवनात पुढे जाण्याची ऊर्जा मिळते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन गोगलगांव यांच्या वतीने भगवद् गीता प्रज्ञाशोध परीक्षा बक्षीस वितरण प्रसंगी सौ शालीनीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, लोणीच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, हरे कृष्ण केंद्र, गोगलगावचे इंद्रयुग्न प्रभु, साधुकृपा प्रभु,कृष्ण नाम प्रभु, अनंत गोविंद प्रभु, डॉ. नितीन घोडपडे, डॉ. मंजुश्री घोरपडे, रसिच गौर प्रभु, शहाजी वारे, अण्णासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या, गुणवत्ता, भारतीय संस्कृती, मुल्यशिक्षण आणि संस्कारक्षम शिक्षणावर प्रवरेचा भर असतो. विविध स्पर्धेतून विद्यार्थी घडत असतो. गोगलगांव येथील इस्कॉनचे कार्य हे प्रेरणादायी आहे असे सांगून यश आणि अपयश यांची चिंता न करता स्पर्धेत सहभाग घ्या अनुभव घेऊन पुढे जा असा सल्ला सौ. विखे पाटील यांनी दिला.
स्पर्धेत सोहम अर्जुन पुलाटे, सुजय अतुल आसावा, सृष्टी सुभाष पोटे यांनी इयत्ता ५ वी ते ७ वी गटात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. तर इयत्ता ८ वी ते १० वी गटात आर्यन मल्हारी सोन्नर, मिनल व्यंकटराव खतगांवकर, ओंकार बापूसाहेब गिते यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेमध्ये 36 शाळेतून १२२५ विद्यार्थ्यानी नोंदविला.