जनता आवाज
लोणी(प्रतिनिधी):-महिलांनी कुटुंबाची काळजी बरोबर आपल्याही आरोग्याची काळजी घ्यावी.महीलांनी आहार आणि आरोग्य याबाबत जागृत राहून निरोगी नारी निरोगी कुटूंब ही संकल्पना पुढे जपावी असे प्रतिपादन लोणीच्या जनसेवा फौंडेशनच्या प्रकल्य संचालिका सौ.रुपाली लोढे यांनी केले.
लोणीच्या पद्यश्री विखे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने महिलांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी रूपाली लोंढे बोलत होत्या.या कार्यक्रमास प्रिया मगर , वैशाली सुभाष बाजारे , नमिता खर्डे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप प्राचार्या प्रा.छाया गलांडे या होत्या.
महिलांचे आरोग्य याबाबत बोलतांना सौ.लोढे म्हणाल्या विद्यार्थिनींच्या व महिलांच्या इंटरनल हायजिन बद्दल विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतीच्या पद्धतीने तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकिन्स किती फायदेशीर आहेत हेही विद्यार्थिनींना पटवून देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सक्षमीकरण कक्षाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पलघडमल यांनी केले. आभार डॉ. वैशाली मुरादे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरभी भालेराव यांनी केले.