कोल्हार ( जनता आवाज ) :- दिनांक 10 व 11 जानेवारी ,2023 ला अंतर्राष्ट्रीय हिंदी अधिवेशन मॉरिशस येथे संपन्न झाले. मॉरिशस येथील महात्मा गांधी संस्थान आणि दिल्ली येथील भाषा सहोदरी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानातुन 10 जानेवारी रोजी विश्व हिंदी दिनाचे औचित्य साधुन या अंतर्राष्ट्रीय हिंदी अधिवेशनचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन मॉरिशसचे विदयमान राष्ट्रपती श्री पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पुणतांबा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अजीजभाई इनामदार यांच्या सुपुत्री प्रा. डॉ. ऐनूर शेख यांची निवड झाली होती. शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राहाता येथील हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ शेख यांनी ‘विश्व में हिंदी तथा हिंदी साहित्य का महत्व’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले .
त्यांना या कार्यक्रमात प्रदीर्घ हिंदी भाषा व हिंदी साहित्य सेवेसाठी विश्व हिंदी दिवसाचे औचित्य साधुन नौव्या विश्व हिंदी अधिवेशनात महात्मा गांधी संस्थान, मॉरिशस मध्ये ‘ सहोदरी रत्न ’ उपाधी ने सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. शेख या 22 वर्षा पासुन राहाता महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत आहे. प्रा. शेख या राष्ट्रीय हिंदी सेवी महासंघाच्या संचालक मंडळाच्या सदस्या, मेरठ येथील राष्ट्रीय हिंदी परिषदे च्या संरक्षक तसेच नवी दिल्ली येथील नागरी लिपि परिषद , गाजियाबाद येथील अखिल भारतीय राष्ट्रभाषा विकास संस्थान व इलाहाबाद येथील विश्व हिंदी साहित्य सेवा संस्थान इ. संस्थांच्या आजीवन सदस्य ही आहे. राष्ट्रभाषा हिंदी च्या प्रचार- प्रसार कार्यासाठी दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली द्वारा दिला जाणारा ‘वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप सन्मान ’ त्यांना मिळाला आहे.
प्रा. डॉ शेख यांच्या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, मा. खासदार. डॉ सुजय विखे पाटील, तसेच शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर डॉ. महेश खर्डे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. सोमनाथ घोलप , उपप्राचार्य प्रा. संजय लहारे, प्रा. डॉ. सुरेश पुलाटे , प्रा. डॉ दादासाहेब डांगे, आय क्यू ए सी चे प्रमुख प्रा. डॉ. विक्रम भालेकर, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले .