राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ) :-राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावातील भांबारेमळा येथे निळवंडेचे पाणी बंधाऱ्यात आले असता दोन सख्या भाऊ – बहिणीचा जीव गेला आहे, यामध्ये साहिल प्रशांत डोषी वय (१२ ) व दिव्या प्रशांत डोषी वय (१५) या चिमुरड्यांचा निळवंडेच्या पाण्यात जीव गेला आहेत .
अनेक वर्षानंतर प्रथमच कोऱ्हाळे गावात निळवंडेचे पाणी मंगळवारी दाखल झाले होते, परंतु ह्या पाण्याचा साठा बुधवारी वाढला होता ,पाण्याचा आनंद घेण्यासाठी चिमुरडे गेले असता त्यांचा अंत झाला . त्यामुळे संपूर्ण गावात एकच शोककळा पसरली आहे.
बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली, प्रवरा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांना वाळकी गावात कार्यक्रमात असताना माहिती समजताच त्यांनी प्रशासनाला संपर्क केला, यावेळी राहाता पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत, मृतांना बाहेर काढून शविच्छेदनास राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते . सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राहाता पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते .