लोणी दि.१८ प्रतिनिधी
श्री वरदविनायक सेवाधाम, लोणी येथे सोमवार दि. 23 जानेवारी २०२३ पासून श्री. गणेश जयंती किर्तन महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राज्यातील नामवंत किर्तनकार या किर्तन महोत्सवामध्ये भाविकांना प्रबोधन करणार आहेत.
सेवाधामचे मठाधिपती महंत उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली १० वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. सोमवार दि. २३ जानेवारी २०२३ रोजी महसुलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या ध्वजपुजन होणार असून यानिमित्ताने माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगांवचे महंत रमेशगिरीजी महाराज, ओम गुरुदेव आश्रम कोकमठाणचे संत परमानंदगिरीजी महाराज आदीची प्रमुख उपस्थिती असणार आहे
या महोत्सवामध्ये पहाटे ५ ते ६ योग प्राणायाम, ६ ते ७ काकड आरती, सकाळी ८ ते ९ स्तोत्रपठण आणि गीतापाठ, सकाळी १०.३० ते १२.३० किर्तन त्यानतंर महाप्रसाद, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ, सायंकाळी ७ ते ९ यावेळेत किर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.या किर्तन महोत्सवामध्ये सोमवार दि.२३ जानेवारी रोजी सकाळ सञात पारनेर येथील ह. भ.प. एकनाथ महाराज चत्तर शास्त्री, सायंकाळ सत्रात सिन्नर येथील ह.भ.प. किशोर महाराज खरात यांचे किर्तन तर खडकेवाके येथील ह.भ.प. विकास महाराज यादव यांचे प्रवचन, मंगळवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळ सत्रात अकोला येथील रामायणाचार्य ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, सायंकाळ सत्रात मालेगांव येथील ह.भ.प. नरेंद्र महाराज गुरव यांचे किर्तन तर लोणीखुर्द येथील ह. भ. प. हर्षद महाराज भागवत यांचे प्रवचन, बुधवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळ सत्रात कुरुक्षेत्र हरियाणा श्री श्री. महामंडलेश्वर स्वामी रामदासजी महाराज, सायंकाळ सञात आळंदी येथील ह.भ.प. डॉ. सुभाष महाराज गेठे यांचे किर्तन तर लोणीखुर्द येथील ह. भ. प. प्रभंजन महाराज भगत यांचे प्रवचन राञी ९ ते ११ यावेळेत सारेगमपच्या विजेत्या अंजली आणि नंदिनी गायकवाड यांची सांगितमय भजनाचा कार्यक्रम, गुरुवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळ सत्रात वानप्रस्थ उपासना क्षेत्र शहापूर ठाणे येथील भाषाप्रभु ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे किर्तन तर लोणी येथील ह.भ.प. भारत महाराज धावणे यांचे प्रवचन होऊन श्री सायंकाळी ६ ते ८ यावेळेत वरदविनायक सेवाधाम, लोणीचे मठाधिपती महंत ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांचे काल्याचे किर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी या श्री गणेश जयंती किर्तन महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन वरदविनायक सेवाधामच्या वतीने करण्यात आले.