शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-अल्पवयीन मुलाला विहीरीत फेकुन देवुन जिवे ठार मारुन फरार झालेल्या आरोपीला शेवगाव पोलीसांनी केले २४ तासामध्ये गजाआड शेवगाव पोलिसांना यश मिळाले आहे.
शेवगाव तालुक्यातील दहिफळ जुने येथील मयत नामे अमन शाकीर शेख वय-10 वर्षे तसेच तोफीक सुभान शेख दोघे रा.जुने दहीफळ ता.शेवगाव हे गावातील दहीफळ-घोटण जाणाऱ्या रस्त्याने रनिंग करीत असतांना यातील आरोपी नामे सचिन गोरख भारस्क्र रा.जुने दहीफळ ता.शेवगाव व पिनु गंगाराम भारस्कर रा.सदर हे पायी चालत असतांना अमन शाकीर शेख याचा पाय घसरुन सचिन गोरख भारस्कर याचे अंगावर पडल्याने त्याचा त्याला राग येवुन त्याने अमन शेख यास मारहाण करुन रस्त्याचे कडेला असलेल्या विहीरीमध्ये उचलुन फेकुन देवुन जिवे ठार मारले आहे.यातील फिर्यादी बीबी गुलाब शेख (वय-65 रा.जुने दहीफळ ता.शेवगाव) यांचे फिर्यादीवरुन शेवगाव पोस्टे गुरनं 470/2025 भा.न्या.सं.कलम 103(1) प्रमाणे दि.22/05/2025 रोजी दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपी नामे सचिन गोरख भारस्कर वय-22 वर्षे रा.जुने दहीफळ ता.शेवगाव हा गुन्हा केल्यानंतर ताबडतोब फरार झाला होता.मा.पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे सचिन गोरख भारस्कर हा नेवासा मार्गे पुणे येथे पळुन जाणार असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथक तयार करुन त्याचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले होते.सदर आरोपी हा नेवासा मार्गे पुणे येथे पळुन जात असतांना फत्तेपुर ता.नेवासा शिवारामध्ये पाठलाग करुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीस शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, मा.अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान नागरे, पो.हेकॉ चंद्रकांत कुसारे,पो.हेकॉ. किशारे काळे,पो.कॉ. शाम गुंजाळ,पो.कॉ. राहुल खेडकर,पो.कॉ. संपत खेडकर,पो.कॉ. संतोष वाघ,पो.काँ. प्रशांत आंधळे,पो.हेकॉ. निलेश म्हस्के तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पो.काँ. राहुल गुड्डु यांनी केली असुन वरील गुन्ह्यांचा तपास सपोनि. काटे हे करत आहेत.