संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्याच्या पठार भागा तील हिवरगाव पठार ग्रामपंचायतीचे काँग्रेसचे सदस्य रामदास भिमाजी गोंदके यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा थेट सरपंच सुप्रिया मिसाळ यांच्याकडे सादर केला आहे. या राजेनामा नाट्याने पठार भागाच्या राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे.
गोंदके हे आदिवासी बहुल असलेल्या हिवरगाव पठार ग्रामपंचायतच्या गिर्हेवाडी प्रभागातून निवडून आलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावान कार्यकर्ते होते. मात्र या प्रभागातील आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी तसेच त्यांच्या प्रश्नांबाबत माजी मंत्री थोरात यांच्याशी चार-पाच महिन्या पूर्वी संपर्क साधण्याचा प्रयत्न चार-पाच महिन्यापूर्वी प्रयत्न केला होता, कोणतीही दखल घेतली गेली नाही, असा आरोप गोंदके यांनी केला आहे. “जर आदिवासी समाजाचे प्रश्नच मार्गी लागणार नसतील, तर या पक्षात राहून उपयोग होणार तरी काय असं सवाल उपस्थित करत. आदिवासी समाजाच्या अपेक्षा आणि त्याचे प्रतिबिंब दिसून येत आहे तसेच त्यांच्या या निर्णयामागे केवळ व्यक्तिगत नाराजी नसून, पक्षाची नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.या राजीनाम्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढू शकते आणि याचा आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो अशी ही चर्चा साकुर पठार भागात होत आहे.




Total Users : 629236