spot_img
spot_img

जांभुळवाडी गावाचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतर होणार – आ.अमोल खताळ 

संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा): – संगमनेर तालुक्यातील मौजे जांभुळवाडी व मौजे साकूर ता.संगमनेर या दोन स्वतंत्र ग्रामपंचायत असल्या तरी महसुली सजा एकच असल्याने जांभुळवाडीचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतरण करण्याची नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची जुनी मागणी होती.महसुली सजा स्वतंत्र नसल्याने अनेक प्रशासकीय अडचणी येत होत्या.महायुतीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.या मागणीची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली जांभुळवाडी गावाचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतरण केल्याची माहिती आ. अमोल खताळ यांनी दिली आहे.तसेच सदर अधिसुचना अप्पर जिल्हाधिकारी श्री.बाळासाहेब कोळेकर यांनी प्रसिद्ध केली आहे.

या निर्णयामुळे साकूर या महसुली गावाचे साकूर व जांभुळवाडी या दोन स्वतंत्र महसुली गावांत विभागणी झाली असुन जांभुळवाडी या गावाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळणार आहे.तसेच जांभुळवाडी हद्दीतील साकूर मध्ये समाविष्ट असलेले भुमापन क्रमांक वगळुन नव्याने जांभुळवाडी मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.

या निर्णयाचे जांभुळवाडी परिसरातुन मोठ्या प्रमाणात स्वागत होत असुन 40 वर्षांचा प्रश्न 100 दिवसांत मार्गी लावल्याने पठारभागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर,बुवाजी पा.खेमनर,भाजपा अध्यक्ष गुलाबराजे भोसले,भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख,मच्छिंद्र खेमनर,युवराज खेमनर,नागेश कोळेकर,संतोष खेमनर,मन्सुर पटेल,बाळासाहेब दिनकर खेमनर आदी.कार्यकर्ते व नागरिकांनी आ. अमोल खताळ .व पालकमंत्री.राधाकृष्ण विखे पा.तसेच महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!