18.7 C
New York
Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

सामाजिक कार्याचा वारसा जपत प्रवरेच्या चिंचोली येथील सिंधु छाया कॅम्प येथे रक्तदान आणि वृक्ष संवर्धन उपक्रम  मंञी विखे पाटील यांचा वाढदिवस…

लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-सामाजिक कार्याचा वसा घेत सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चिंचोली सिन्नर येथील सिंधू छाया कॅम्प एस.एस व्ही आय टी आणि अर्पण रक्त केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर, मोफत नेञ , हिमोग्लोबिन,ईसीजी ची तपासणी बरोबरच शाळा महाविद्यालयाच्या वतीने वृक्ष संवर्धनाचा संदेश देत साजरा करण्यात आला . 

आपला वाढदिवस हा कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम करण्याऐवजी सत्काराला फाटा देत सामाजिक उपक्रम म्हणून साजरा करावा असे आवाहन मंञी विखे पाटील यांनी केले होते केले. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरेच्या सर्वच शाळा महाविद्यालयामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.चिचोली सिन्नर येथे झालेल्या कार्यक्रमास संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, एस व्ही आय टी प्राचार्य डाॅ.गणेश शिंदे, कॅम्पस डायरेक्टर डाॅ.बाळासाहेब घुले, सी. ई. वो सेक्रेटरी डॉ. राणा महाजन सर्व विभाग प्रमुख , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या, मंत्री विखे पाटील यांनी सामाजिक कार्याचा वसा कायमच जपला आहे. या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या उपक्रम राबवत असताना राजकारण नव्हे तर समाजकारणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रम उपक्रमातून साजरा व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे आणि याच माध्यमातून वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळावे पर्यावरणाचा संवर्धन व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या चिंचोली येथील सिंधू छाया कॅम्पस या ठिकाणी विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालकांच्या उपस्थित करण्यात आले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि गावातील सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गाव पातळीवरती वृक्षारोपण करून हा वाढदिवस सामाजिक बांधिलकी म्हणून साजरा होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि आजूबाजूच्या खेडोपाडी असणाऱ्या विद्यार्थी हे शिक्षणाच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी चिंचोली कॅम्पस या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा,माध्यमिक विद्यालय, नर्सिंग महाविद्यालय त्याचबरोबर तांत्रिक शिक्षणासाठी विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. मागील दोन वर्षापासून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील यांनी हा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्याने या परिसराची शोभा अधिकच वाढली आहे. त्याचबरोबर परिसरामध्ये एकाच ठिकाणी केजी पासून पीजीचे शिक्षण मिळत असल्यामुळे हा परिसर देखील शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!