spot_img
spot_img

पुणे विद्यार्थी गृह संस्थेत ना. विखेंचा वाढदिवस साजरा

पुणे(जनता आवाज वृत्तसेवा):-पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या विविध शाखांमध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य त्याचप्रमाणे मिष्ठान्नाचे वाटप करण्यात आले. 

यानिमित्ताने विविध विभागांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, कार्यवाह संजय गुंजाळ, उपकार्याध्यक्ष अमोल जोशी आणि कुलसचिव दिनेश मिसाळ हे पंचवटी शाखेत उपस्थित होते. तर पुणे येथे संस्थेचे संचालक रमेश कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील गरजवंत विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. नवीन शालेय वस्तू मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जीवनपट उलगडवून सांगितला. ना. विखे यांनी संस्थेसाठी केलेल्या कार्याचाही आढावा घेतला. कार्यक्रमास या परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!