27.4 C
New York
Monday, June 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

लोणी पोलीस स्टेशनची गोवंशाची कत्तल करणाऱ्यावर धडक कारवाई

लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-आज दि. २० रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर येथे ९ वा. चे सुमारास कुरेशी मोहलनातील शोयेब यासीन शेख याचे राहते घराचे पाठीमागील बाजूस हिरव्या रंगाचे पत्र्याचे शेडमध्ये, ममदापूर ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर येथे लोणी पोलीस स्टेशनचे पथक यांनी छापा टाकला असता आरोपी शोपेब यासीन कुरेशी वय-२८ वर्षे  अब्दुल रहेमान यासीन शेख वय-३० वर्षे  अब्दुल करीम कुरेशी,  मुनीर आमीर कुरेशी,  शाकीब रज्जाक कुरेशी, साजीद मुनीस कुरेशी,  बकर उर्फ गोट्या राजु शेख सर्व रा. कुरेशी मोहल्ला ममदापुर ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर यांनी गोवंशीय जनावरांची कत्तल करताना तसेच कत्तली साठी आणलेल्या जनावरांना मोकळ्या जागेत विना अन्न पाण्याचे बांधून ठेवलेल्या स्थितीत मिळून आले.

सदर कारवाई मध्ये मिळाला माल-१,४०,०००/-रुपये किंमतीचे ७०० किलो वजनाचे गोवंशीय जातीचे कत्तल केलेले गोमांस  ३०,०००/- रुपये किमतीची पांढरे रंगाची एक गावरान गाय किंमत अंदाजे१०,०००/- रुपये किंमतीच्या ३ गोवंशीय जातीचे काळया पांढ-या रंगाचे जैसर्सी गायी किंमत अंदाजे४००-००/- किंमतीचे दोन चाकू व कोयता जु.या. कि, अंदाने,एकून किंमत २,६०,०००/- रुपये.

सदर कारवाईमध्ये फिर्यादी नामे पोहेकॉ/२१५२ कल्याण मधुकर काळे, नेमणूक लोणी पोलीस स्टेशन अहिल्यानगर मोबाईल नंबर ९२८४६२९९०९. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नामे  शोपेब यासीन कुरेशी वय-२८ वर्षे  अब्दुल रहेमान यासीन शेख वय-३० वर्षे  अब्दुल करीम कुरेशी,  मुनीर आमीर कुरेशी,  शाकीय रज्जाक कुरेशी,  साजीद युनीस कुरेशी,  बकर उर्फ गोट्या रानु शेख सर्व रा. कुरेशी मोहल्ला ममदापुर ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर याचे विरुद्ध लोणी पोस्टे येथे गुरनं. ३६७/२०२५ महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ वे सुधारीत २०१५ से कलम ५(अ), ५(४), ५ का, ९ सह प्राण्यांना निर्देयतेने वागवीनेचे कलम ३,११ प्रमाणे दि. 20 रोजी दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक  सोमनाथ घार्गे ,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म, शिरीष वमने, यांचे मार्गदर्शनाखाली  कैलास वाघ सहा. पोलीस निरीक्षक लोणी पोलीस स्टेशन, पो.स.ई. आशिष चौधरी, श्रेणी पो.स.ई. सांगळे, स.फौ. पवार, पो.हे.कॉ. साळवी, पो.हे.कॉ. काळे यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!