26 C
New York
Thursday, June 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

जवखेडच्या तांबुळदेव येथे,हजारो हिंदू तरुणांच्या उपस्थितीत आ. जगताप आ. राजळेंकडून नाथांची आरती संपन्न,देवस्थानस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

करंजी (जनता आवाज वृत्तसेवा):- छत्रपती शिवरायांचा जयजयकार करत सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी जवखेडे खालसा शिवारातील तांबुळदेव मंदिरात गुरुवारी सामूहिक महाआरती केली. तर काही उत्साही तरुणांनी घुमट आकाराच्या शिखरावर चढून भगवा ध्वज फडकवला. आ. संग्राम जगताप व आ. मोनिका राजळे,अशोक महाराज पालवे,सागरभैया बेग यांच्यासह विविध संत महंत कार्यकर्त्यांनी चैतन्य कानिफनाथांच्या स्थळावर भगवे वस्त्र फडकवत पूजा केली. कानिफनाथांची मूर्ती स्थापना करण्याचा बेत मात्र पोलिसांनी हाणून पाडत मूर्ति ताब्यात घेतली.या प्रकरणाने वातावरणात तणाव वाढला आहे.

तालुक्यातील जवखेडे शिवारात मिरी तिसगाव रस्त्यावर तांबुळदेव देवस्थान आहे. हिंदू बांधव त्याला कानिफनाथांचे तर मुस्लिम बांधव रमजान दर्गा मानतात. मढी व मायंबा येथे गुरुवारी व दर अमावस्येला नाशिक जिल्हा नगर उत्तर भागातून येणारे नाथ भक्त आवर्जून दर्शन घेतात. तेथे मुस्लिम पुजारी असतो. त्यांच्या प्रथेप्रमाणे तेथे विधी करतात. मात्र याकडे आतापर्यंत कोणी फारसे गांभीर्याने बघितले नाही. आठ दिवसांपूर्वी मागच्या गुरुवारी आरती करण्यावरून दोन गटात शाब्दिक चकमक अन हाणामारी होऊन तणाव वाढला. वक्त बोर्डाच्या पुढे काल बुधवारी मुस्लिम बांधवांनी अर्ज दाखल केला होता.

त्याबाबत तातडीने दखल घेत विशिष्ट तरुणांना येथे येण्यास मज्जाव करण्यात आला. या प्रकाराने हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. सुमारे अडीचशे एकर जमीन या देवस्थानच्या नावावर असून ती कसण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या ताब्यात आहे. कोट्यवधी रुपये किमतीची ही जमीन आहे. 100 एकर जमिनीवर मज्जिद ट्रस्ट तर उर्वरित जमिनीवर रमजान दर्गा उर्फ कान्होबा देवस्थान अशी नोंद आहे.

आठ दिवसांपूर्वी गुरुवारी आरती करण्यावरून दोन गटात शाब्दिक चकमक हाणामारी होऊन आरती होण्यापूर्वी तेथे तणाव वाढला. स्थानिक पोलिसांसह जिल्हा पोलिसांनी दोन्ही समाजामध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला. तो व्यर्थ ठरून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक होत नियोजनाप्रमाणे आज दुपारी पावणे बारा वाजता सामूहिक महाआरती केली. शंख, डमरू, नाथपंथीय चिमटा वाजवत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पोलीस यंत्रणे कडून संयम बाळगत घुमटावर चढलेले कार्यकर्ते, आरती म्हणताना उत्साही कार्यकर्त्यांनी देवावरील पूर्वीची जुनी वस्त्रे फेकून दिली त्यावर नवीन वस्त्र हार अर्पण केले.

यावेळी पंचक्रोशीतील कार्यकर्ते, अनेक नाथपंथी उपासक, तसेच माजी सभापती संभाजी पालवे, सरपंच चारुदत्त वाघ, विश्व हिंदू परिषदेच्या प्रणाली कडूस, मढीचे सरपंच संजय मरकड, हिंदुत्ववादी नेते सागरभैय्या बेग, दीपक काळे महाराज यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सकाळी कार्यक्रम स्थळाकडे निघालेल्या मुस्लिम कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही अंतरावरच रोखून माघारी पाठविल्याने मोठा अनर्थ टळला. पावणे अकरा वाजता आमदार जगताप व आमदार राजळे यांचे कार्यकर्त्यां सह आगमन झाले.

त्यानंतर वातावरण तापायला सुरूवात झाली. पोलीसही सभास्थळाभोवती शस्त्र सज्ज होऊन गोल कडे करून थांबले. आरती होण्यापूर्वी तेथे कार्यकर्त्यांपुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले, येथे सकाळ सायंकाळ आरती करा. आपल्याच देवाची पूजा करू नका असे कोणी म्हणू शकत नाही. तुम्ही गाफील राहिलात,. त्याचा गैरफायदा जीहाद्यांनी घेतला. आपल्या तरुणांवर तलवारीने हल्ला होऊनही पोलिसांनी दोन्ही समाजातील मिळून 60 जणांविरुद्ध कारवाई कशी केली. दोन्ही बाजूंनी समान न्याय अशी पोलिसांची भूमिका योग्य नाही. देवस्थानला हिंदूंचा इतिहास आहे. भगव्याचे रूपांतर हिरव्यात केले. पूर्वी येथे पत्र्याची शेड नव्हती, सभागृहात ब्लॉक बसवले गेले, तेव्हा आपण दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम भोगण्यापूर्वी आता संघटित व्हा. गावाचा एकोपा बाळगा. आम्ही हार फुले आणली ती पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांना जाहीर विनंती करतो, वेगळे वळण लावू नका. आमचे हार फुले ताब्यात द्या. अन्यथा या घटनेचे लोन जिल्हाभर पसरेल. हिंदूंना पोलिसांनी टार्गेट करू नये. असे म्हणताच पोलिसांनी हार फुले व पूजा साहित्य परत केले.

यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, सुमारे वीस वर्षांपूर्वी हे देवस्थान हिंदूंच्या ताब्यात होते. आपले दुर्लक्ष आपल्याला भोवले. गर्दी जमवून, मोर्चे काढून फारसा उपयोग नाही. सर्व हिंदूंनी एकत्रित या. जाती भेदाचा कलंक पुसून टाका. गुन्हा नोंदविण्याबाबत पोलिसांनी चुकीची पद्धत अवलंबिली. हिंदुत्वाचे काम करणाऱ्या, गोरक्षण करणाऱ्यावर कोणतेही संकट आले तर संघटित व्हावे लागेल. गावोगावी भाईचाऱ्यांची परिस्थिती आहे का याचा विचार करा. अनेक जमिनी वक्त बोर्डाच्या ताब्यात असून त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय लवकरच घेतील.

विधानसभेच्या येत्या 30 तारखेला होणाऱ्या अधिवेशनात या प्रकरणाबाबत शासनाचे आपण लक्ष वेधू .धर्मांध लोक आपल्या मुली बाळींना टॉर्चर करतात. दोन नंबरच्या गुटखा माव्यातुन मिळणारा पैसा या कामासाठी वापरला जातो. आर्थिक नाड्या ठेचा. संतोष खाडे सारखा उप अधीक्षक मनापासून काम करतो. त्यांनी जिल्ह्यातील मावा, गुटखा अवैधबंदे बंद झाल्याचे चित्र झाले आहे. आशा स्वरूपाची कारवाई जिल्ह्यात अपेक्षित आहे. दरम्यान आज दुपारी उशिरा पोलिसांनी घुमटावर लावलेले झेंडे व सभामंडपातील भगव्या कापडी पट्ट्या हटविल्या. दोन्ही गटांमध्ये यापूर्वी झालेल्या समझोत्या नुसार गुरुवारी हिंदूंनी तर शुक्रवारी मुस्लिमांनी पूजा करायची आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन करत हिंदूंनी महाआरती केली. आता मुस्लिम बांधवांकडून शुक्रवारी म्हणजे उद्या काय पाऊल उचलले जाते.

त्यावर पुढील चित्र अवलंबून आहे. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील,प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी व शेवगावचे निरीक्षक संतोष मुटकुळे यासह मुख्यालयातील विविध अधिकारी, विशेष राखीव दल, शीघ्रकृतिदल, महिला व पुरुष पथक असा मोठा फौज फाटा यावेळी तैनात करण्यात आला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग जातीय तणावाच्या भोवऱ्यात गुरफटत चालला आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!