26.4 C
New York
Sunday, June 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

आ. जगतापांच्या नेतृत्वात ‘महाराजस्व’ शिबिर राबविणार-संपत बारस्कर शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजस्व समाधान शिबिर

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):-  नगर जिल्हा महसूल विभागाच्या वतीने एकाच छताखाली सर्व प्रकारचे दाखले व योजनांसाठी लागणारे कागदपत्रे देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केल्यास आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अहिल्यानगर शहरात हे अभियान यशस्वीपणे राबवले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्याला लागणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले.

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त राज्य शासन व महसूल विभागाच्या वतीने बालिकाश्रम रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झाले.

यावेळी लाभार्थ्याना दाखल्याचे वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपत बारस्कर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, प्रा. माणिकराव विधाते, माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर, माजी नगरसेवक विलास ताठे, मनोज ताठे, एडवोकेट सुनील सूर्यवंशी आदींसह महसूल विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, शासनाच्या विविध योजना कार्यान्वित असून त्याला लागणारे कागदपत्र मिळविण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये अनेक हेलपाटे मारावे लागतात या त्रासाला कंटाळून नागरिक योजनेपासून दूर राहतात म्हणून शासनाने एका छताखाली आणि लगेच दाखले कागदपत्र देण्यासाठी प्रभागांमध्ये जाऊन शिबिराचे आयोजन केले आहे त्यामुळे नागरिकांना शासनाच्या योजनांचा तातडीने लाभ घेता येईल, असे ते म्हणाले

आ. जगताप यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर शहरात शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केले असून यामध्ये जातीचे, उत्पन्न दाखले, डोमासाईल व इतर शैक्षणिक दाखले, महिला व बाल विकास विभागाच्या योजना. शिधा पत्रिका, शिक्षण विभागाच्या योजना, संजय गांधी योजना, वन विभागाच्या योजना, पंचायत समितीच्या विविध योजना, भूमि अभिलेख विभागाच्या योजना, कृषी विभागाच्या योजना, आरोग्य विभागाच्या योजना, पशुधन विभागाच्या योजना असतील. यासाठी महसूल मंडळातील बहुसंख्य लाभार्थी, नागरिक, विद्यार्थी यांनी या शिबिरामध्ये योजनेच्या आवश्यक कागद पत्रासह उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.

– प्रा. माणिकराव विधाते

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!