spot_img
spot_img

राहुरीत कंटेनर-दुचाकीच्या अपघातात तरुणी ठार

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा) :- महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पेट्रोल पंपाजवळ काल शुक्रवार रोजी दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान कंटेनर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात राहुरी कृषी विद्यापीठ येथे शिक्षण घेत असलेल्या पुण्यातील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

सुचिता आधाटे (वय २८, रा. पुणे) असे तिचे नाव आहे. ती कृषी विस्तार विभागात पीएच.डी. तृतीय वर्षाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत होती.

सदरील ट्रक नगरहुन राहुरीच्या दिशेने जात असताना दुचाकीला (एमएच 14 एलएन 2809) भरधाव कंटेनर (टीएन डीएक्स 3157) ने जोरदार धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच विद्यापीठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी जखमी तरुणीला तातडीने शासकीय वाहनातून महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने अहिल्यानगर येथे उपचारासाठी हलविले. मात्र अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला झाला. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गणेश सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतला आहे. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!