22.3 C
New York
Thursday, July 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपुरात बनावट देशी भिंगरी दारुचा कारखाना उध्दवस्त 1 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त; तीन आरोपींना अटक

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- भैरवनाथनगर (गोंधवणी) परिसरात सुरू असलेल्या बनावट देशी भिंगरी दारुचा कारखाना शहर पोलिसांनी उध्दवस्त केला. या प्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 66 हजार 320 रूपयांचा मुद्देमाल हस्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लता महादू राऊत यांचे मालकीच्या घरामध्ये (कदम वस्ती, भैरवनाथनगर श्रीरामपूर) येथे बनावट देशी भिंगरी संत्रा दारु बनवत आहेत. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने त्यांनी या ठिकाणी पंचासह छापा टाकला असता तेथे आरोपी मोसीन इक्बाल सय्यद (वय 24, रा. संजयनगर पाणी टाकीजवळ वॉर्ड नं.2, श्रीरामपूर), अरबाज अनिस मलंग (वय 25, रा. गुलशन चौक जवळ वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर), अन्वर शब्बीर शहा (वय 47, रा. संजयनगर डावखर मैदान बर्फ कारखान्याजवळ वॉर्ड नं.1, श्रीरामपूर) हे बनावट देशी भिंगरी संत्रा तयार दारु बॉटलमध्ये भरुन पंच करुन त्याला लेबल लावताना मिळून आले.

बनावट देशी भिंगरी संत्रा दारु बनवण्याकरीता लागणारे स्पिरीट व इतर साहित्य कोणाकडून घेतले व सदरचे घर कोणाचे काणाचे आहे असे विचारले असता त्यांनी आरोपी साथिदार प्रमोद बाळासाहेब फुलारे व राहुल बाळासाहेब फुलारे रा. लोंढे मळा, खबडी जवळ, वॉर्ड नं.1, श्रीरामपूर यांच्या कडुन बनावट देशी भिंगरी संत्रा दारु बनवण्याकरीता लागणारे स्पिरीट घेत असल्याचे सांगितले. तसेच सदच्या बॉटल पॅक करण्यासाठी लागणारे झाकण हे शिर्डी येथुन आरोपी साथिदार महेश गाँड ऊर्फ आण्णा रा. शिडी (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्याकडुन घेत असल्याचे सांगितले. तसचे सदरचे घर हे आरोपी साथिदार नामे लता महादु राऊत, रा.वॉर्ड नं. 02, श्रीरामपूर जि. अहिल्यानगर यांचे असल्याचे सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!