22.3 C
New York
Thursday, July 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

चिंचडगाव येथील महिला कीर्तनकार यांची हत्या करणारे दोन आरोपी पोलिसांनी केले जेरबंद…

वैजापूर(जनता आवाज वृत्तसेवा):-चिंचडगाव शिवरात शेत गट नंबर ५९ मध्ये असलेल्या सदगुरू नारायणगिरी आश्रम येथील मोहटा देवी माता मंदिरात चोरी करण्याच्या उददेशाने आलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी मंदिराचे गेटचे लॉक तोडून मंदिरातील दानपेटी, छोटया मुर्त्या व इतर साहित्य चोरी करून मंदिराजवळच पत्र्याचे शेड बाहेर झोपलेल्या महिला प्रवचनकार/किर्तनकार संगीताताई अण्णासाहेब पवार महाराज यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली होती.

यावरून त्यांचे भाऊ नामे कृष्णा अण्णासाहेब पवार रा. चिंचडगांव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांचे फिर्यादी वरून पोस्टे विरगांच गुरनं. १८७/२०२५ कलम १०३, ३३१(८), ३०५, ३३१ (४) भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात इसमाविरुध्द मोहटा देवी माता मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून चोरी व बहीण नामे प्रवचनकार/किर्तनकार संगिताताई अण्णासाहेब पवार महाराज यांचा दगड डोक्यात टाकून खुन केला मजकुराचे फिर्यादवरून गुन्हा दाखल झाला होता.

नमूद प्रकरणाचे गांर्भीय ओळखून गुन्हयांचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मा. डॉ. विनयकुमार मे. राठोड व अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अन्नपूर्णा सिंह छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्था.गु.शा विजयसिंह राजपूत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे व सपोनि शंकर वाघमोडे पोस्टे विरगांव यांचे वेगवेगळे तपास पथक तयार करून, मार्गदर्शन करून नमूद गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे व पोस्टे विरगांव यांचे पथकास दिनांक ०१/०७/२०२५ रोजी सायंकाळी गोपनीय माहिती मिळाली की, नमूद गुन्हयातील संशयीत वर्णनासारखा मिळता जुळता दिसणारा एक इसम गणेश भेळ सेंटर महालगाव शिवारात फिरत आहे, अशी माहिती मिळाली माहितीची खात्री करणे कामी स्थागुशा पोनि विजयसिंह राजपूत व सपोनी वाघमोडे, सपोनि पवन इंगळे यांच्यासह पथक रवाना झाले. सदर संशयीत इसमास गणेश भेळ सेंटर महालगाव येथून चौकशी ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाचगांव विचारून अधिक चौकशी केली असता त्यांने त्याचे नाव  संतोष उर्फ भायला पिता जगण चौहान वय २२ वर्ष रा. अंछली ता. सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्यप्रदेश ह. मु. गाढे पिंपळगाव ता. वैजापूर (मजुरी साठी आला होता मागील वर्षभरापासून) असल्याचे सांगून त्याने त्याचा साथीदार नामे  अनिल उर्फ हाबडा पिता नारायण विलाला वय २३ वर्ष रा. अंछली ता. सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्यप्रदेश याच्यासह केल्याची कबुली दिली. अनिल विलाला हा त्याचे गावी पळून गेल्याचे सांगितले. यावरून पोनि स्थागशा यांनी एक पथक तात्काळ मध्यप्रदेशकडे खाना केले. सदर तपास पथकाने त्याचा शोध घेवून त्यास मध्यप्रदेश बॉर्डर वर शिरपूर येथन ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा साथीदार नामे संतोष उर्फ भायला पिता जगण चौहान याच्यासह केल्याची कबुली दिली. प्राथमिक तपासामध्ये नमूद गुन्हा त्यांनी चोरी करण्याचे उददेशाने केला असल्याचे कबूल केले आहे. दोन्ही आरोपीतांना पुढील कायदेशीर कार्यवाही कामी पोलीस ठाणे विरगाव येथे हजर करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. विनयकुमार मे. राठोड, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधीकारी भागवत फुंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह राजपूत, सपोनि शंकर वाघमोडे (प्रभारी अधिकारी विरगांव), स्थागुशा पथकाचे सपोनि संतोष मिसळे, सपोनि पवन इंगळे, सपोनि सुधीर मोटे, पोह, वाल्मीक निकम, विठठल डोके, शिवानंद बनगे, अशोक वाघ, गोपाळ पाटील, महेश बिरूटे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, चालक संजय तांदळे, निलेश कुडे तसेच, पोह विजय ब्राम्हदे, गणेश पंडूरे, रावते, अभंग, चालक जिरे यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!