लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-कला क्षेत्रातील विद्यार्थी त्यांना विविध स्पर्धा आणि मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने स्थापन झालेल्या प्रवरा परिसर कला अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र तुपे उपाध्यक्षपदी संतोष पुलाटे खजिनदारपदी किशोर आहेर तर सचिव पदी संजय तुपे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असतात या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रवरा परिसर कला अध्यापक संघ हा कार्यरत आहे. या संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा त्याचबरोबर विविध कला क्षेत्रातील करिअरची माहित संघाच्या माध्यमातून दिली जाते.मागील अनेक वर्षापासून या संघाच्या माध्यमातून परिसरातील विविध विद्यार्थ्यांना या संघाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे आदींसह प्राचार्य, शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.