लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-पंढरीची वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा जपण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सुमारे १५हजार विद्यार्थ्यांच्या सहभाग असलेली वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची या अध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून,वारकरी वेषभूशेतील विद्यार्थी वारीतील भव्य रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून प्रति पंढरपूर निर्माण करणार आहेत.
या विशेष उपक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक ५ जुलै २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता लोणी येथील विखे पाटील सैनिकी स्कूल समोरील भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला असून तत्पुर्वी सर्वगावांमधून विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचा सहगाग असलेल्या दिंड्या टाळ मृदूगांचा गजर आणि विठु नामाचा जयघोष करीत सहकारच्या भूमीत दाखल होणार असून यासर्व दिंड्याचे भव्य स्वागत करण्यासाठी सहकार नगरी सज्ज झाली आहे.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या आषाढी वारीच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,पद्मश्रीं डॉ विठ्ठलराव विखे पाटील तसेच लोकनेते पद्मभूषण डॉ बाबासाहेब विखे पाटील यांचे वारकरी सांप्रदायात मोठे योगदान राहीले त्याच विचारांचा वारसा पुढे घेवून नव्या पिढीला अध्यात्मिक विचारांशी जोडण्याचा प्रयत्न या वारीतून करण्यात येत असल्याचे सांगितले.
वारी पंढरीची… ज्ञानगंगा प्रवरेची या संकल्पनेतून प्रवरा शैक्षणिक संकुल आणि प्रवरा परिवारच्या माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, तांत्रिक आणि अतांत्रिक महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा सहभाग या सर्व सांस्कृतिक उपक्रमात असेल यसाठी मागील काही दिवसांपासून विद्यार्थी अतिशय उत्साहाने टाळ मृदूगांच्या तालावर दिंडीतील विविध खेळाचे प्रात्यक्षिक करीत आहेत.
भव्य आशा रिंगण सोहळ्यात भगवे झेंडे घोडेस्वार आणि वारकरी वेषभूशेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनीसह जिल्ह्यातील अध्यात्मिक क्षेत्रातील महंत किर्तनकार प्रवचनकार वारकरी तसेच प्रमुख देवस्थानाच्या दिंड्याच्या प्रतिनिधीसह रिंगण सोहळा अतिशय ऐतिहासिक आणि संस्मरणीय करणार आहेत. या निमित्ताने राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ.राजेंद्र विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आदींसह विविध संस्थांच्या पदाधिकार्यासह प्रवरा परीसरातील सर्व गावांमधील ग्रामस्थ कार्यकर्ते या भव्य सोहळ्यात सहभागी होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.