लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलचा ६१ वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून झाली. प्रमुख पाहुणे म्हणून राहाता पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री. राजेशजी पावसेसाहेब व शाळेचे १९९५ वर्षातील माजी विद्यार्थी प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. राहुलजी शिंदे यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे यांनी केले. तसेच शाळेतील विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
यावेळी इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु आर्या भालेकर हिने आपल्या भाषणातून शाळेतील उल्लेखनीय बाबींची माहिती दिली.
६ जुलै १९६४ रोजी सुरू झालेल्या या शाळेला आज ६१ वर्ष पूर्ण होत आहे. शाळेला प्रगतीचा उज्ज्वल इतिहास लाभलेला आहेत. शाळेची संख्यात्मक व गुणात्मक प्रगती झालेली आहे. शाळेमध्ये फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॉकी या खेळांची स्वतंत्र मैदाने, सुसज्ज असा जलतरण तलाव उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या नीती आयोग पुरस्कृत अटल टिंकरिंग लॅब शाळेच्या वैभवात भर घालत आहे. बाल वैज्ञानिकांना संशोधनाच्या नवीन संधी उपलब्ध करून देत आहेत. शाळेमध्ये अद्यायवत संगणक कक्ष, सुसज्ज अशा विज्ञान प्रयोगशाळा,वाचन कक्ष, कलादालन, संगीत कक्ष, आठ ते दहा हजार पुस्तकांनी युक्त असे ग्रंथालय आहेत.शेवटी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून शालेय आठवणींना उजाळा दिला व शिक्षणात कठोर परिश्रमाला पर्याय नाही, अशी माहिती दिली.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना नवभारत साक्षरता मिशन प्रमाणपत्र,चित्रकला स्पर्धेची प्रमाणपत्रे, नासो परीक्षा प्रमाणपत्र, दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत इ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. शाळेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले गेले.
शाळेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुष्मिता विखे, अतिरिक्त सी ई ओ डाॅ शिवानंद हिरेमठ, माध्यमिक शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच शाळेचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे, उपप्राचार्य श्री के टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ एम एस जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी यांचे कार्यक्रमाच्या नियोजनात अनमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून श्री गुलजार मनियार व सौ आस्मा शेख यांनी काम पाहिले. शेवटी आभारप्रदर्शन दहावीचा विद्यार्थी वरद तांदळे याने केले.