23.1 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

डॉ. सुजय विखे पाटील यांची भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सदिच्छा भेट!

मुंबई(जनता आवाज वृत्तसेवा):- भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांची आज मुंबई येथे खास सदिच्छा भेट डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतली. पक्ष संघटनेतील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करत, आगामी वाटचालीसाठी शुभेच्छांचा मनःपूर्वक निरोप त्यांनी दिला.

याचसोबत, डॉ. सुजय विखे पाटील यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य (२०२५-२८) म्हणून निवड झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या भेटीच्या निमित्ताने राज्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. पक्षाचे कार्य व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांपर्यंत प्रभावी नेतृत्व पोहचवण्यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असा ठाम विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहचवताना संघटनेचा विस्तार आणि कार्यकर्त्यांची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी चव्हाण साहेब निश्चितच नवा अध्याय सुरू करतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

या भेटीदरम्यान सौहार्दपूर्ण वातावरण पाहायला मिळाले आणि आगामी काळात परस्पर सहकार्य अधिक दृढ होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!