शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांना १५जुलै पासून पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
धरणाच्या लाभक्षेत्रात मोठ्या स्वरुपात झालेल्या पावसाने निळवंडे धरणात पाणी साठा समाधानकारक झाला आहे.मात्र धरणातील पाण्याची पातळी राखण्यासाठी धरणातून सध्या पाणी सोडण्यात आले आहे.
सदर पाणी डाव्या आणि उजव्या कालव्याना मिळावे आशी मागणी लाभक्षेत्रातील लोक प्रतिनिधी आणि शेतकरी यांच्याकडून करण्यात येत होती.धरण क्षेत्रात पावासाचे प्रमाण अधिक असले तरी अद्यापही लाभक्षेत्रातील तालुक्यात अपेक्षे इतका पाऊस न झाल्याने खरीप पीकांना धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निर्माण झालेल्या परीस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांशी धरणातील पाणी साठ्या संदर्भात सर्व माहीती घेवून येत्या १५जुलै २०२५ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
मंत्री विखे पाटील यांच्या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्याना मोठा दिलासा मिळणार असून गावातील पाणी योजनांना देखील आवर्तनाचा लाभ मिळणार असल्याने शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यास मोठी मदत होईल.