वनकुटे (जनता आवाज वृत्तसेवा):- ह.भ.प. नाना महाराज वनकुटेकर यांच्या कृपा आशीर्वादाने व वारकरी बांधवांच्या सहकार्याने हभप बाळकृष्ण महाराज कांबळे, एकनाथ महाराज शास्त्री चत्तर, नारायण महाराज गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनकुटे येथे गुरूवार दि. १० जुलैपासून विठ्ठल रखुमाई अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सद्गुरू नाना महाराज वनकुटेकर पुण्यतिथी सोहळयाचेही आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवार दि.१० जुलै रोजी सकाळी १० ते १० दरम्यान हभप बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या किर्तनाने या सप्ताहास प्रारंभ होईल. याच दिवशी सायंकाळी ७ ते ९ दरम्यान समाजप्रबोधनकार निवृत्तीमहाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन होणार आहे.
या सप्ताहात शुक्रवार दि.११ जुलै पासून दररोज सायंकाळी सात ते रात्री ११ दरम्यान किर्तन सेवा पार पडणार आहे. शुक्रवारी हभप स्वामी दत्तागिरी माणिकबाबा, शनिवार दि.१२ रोजी हभप ईश्वर महाराज कदम शास्त्री, रविवार दि.१३ रोजी भागवताचार्य हभप गणेश महाराज शिंदे, सोमवार दि. १४ रोजी हभप रामेश्वर महाराज पवार, मंगळवार दि. १५ रोजी हभप हरिदास महाराज पालवे शास्त्री, बुधवार दि.१६ रोजी हभप एकनाथ महाराज चत्तर शास्त्री, गुरूवार दि.१७ रोजी हभप देवीदास महाराज म्हस्के, शुक्रवार दि. १८ रोजी हभप अक्षय महाराज उगले, शनिवार दि.१९ रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान हभप बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
दैनंदिन कार्यक्रम
पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ९ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ किर्तन सेवा