श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व एजंट यांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरुन सदरचे कार्यालय वादाच्या भोव-यात सापडले असल्याची चर्चा परिसरात होत आहे.
या वादात कार्यालयातील महत्त्वाची कागदपञे गायब झाल्याने कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले असून या वादाचा वाहन धारकांना मानस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूरचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला एजंटांनी घेरले आहे.अधिका-यांचे व एजंटांचे ‘अर्थपूर्ण’ हितसंबंध असल्याने ऐजंटाशिवाय आर.टि.ओ कार्यालयाचे पान देखिल हालत नाही अशी चर्चा आहे.
याच देवाणघेवाणीतून आधिकारी व एजंट यांच्यात वाद उदभवला आहे. या वादाने आता टोकाचे स्वरुप धारण केले असून,आर.टि.ओ कार्यावायातील वाहनांचे आर.सी.बुक,वाहन ट्रान्स्फर संबंधीची कागदपञे,बोजा चढविणे-उतरविणे यासह महत्त्वाची कागदपञे गायब झाल्याची खाञीशीर माहिती उपलब्ध झाली आहे.यामुळे गेल्या १० जूनपासून कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले असून वाहन धारकांना विनाकारण मानःस्ताप सहन करावा लागत आहे.सोमवारपर्यन्त सदरची कागदपञे न मिळाल्यास आर.टि.ओ.अधिकारी पोलिसात रितसर तक्रार दाखल करण्याच्या मनस्थितीत असल्याचे कळते.आर.टि.ओ.कार्यालयातील एजंटांची शिरजोरीबाबत आणि अधिकारी व एजंटांच्या संबंधाबाबत वाहन धारकारात खुमासदार चर्चा रंगत आहे.या प्रकरणी आर.टि.ओ.कार्यालयाच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.