कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-कोल्हार भगवतीपुर येथे गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर दरवर्षीच्या प्रथे प्रमाणे याही वर्षी येथील प्रवरा नदीच्या पात्रात वाहणाऱ्या पाण्याचे पूजन दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूजन करण्याची दोन्ही गावांची ही जुनी परंपरा आहे. याप्रसंगी कोल्हार बुद्रुकच्या सरपंच निवेदिता बोरुडे व उपसरपंच सविता खर्डे यांच्या प्रवरा नदी पात्रात मंत्र उपचार करत नवीन साडी चोळी अर्पण करून जल पूजन करण्यात आले.
याप्रसंगी कोल्हार भगवतीपुरचे सरपंच दत्तात्रय राजभोज उपसरपंच प्रकाश खर्डे ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे प. वि. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे पा.,दिलीप बोरुडे, गोरक्षनाथ खर्डे, मयूर कडसकर, राजेंद्र बर्डे संतोष लोखंडे, पांडुरंग वैद्य, कल्याण खर्डे, आसिफ शेख, चेतन खर्डे, संतोष शिंदे, संजय वाणी आदी उपस्थित होते.